विना ताडपत्री झाकताच होत आहे कोळशाची वाहतूक

वाहतूक विभागाचे दुर्लक्षामुळे प्रदूषण वाढण्यास हातभार

 

विवेक तोटेवार, वणी: कोळसा वाहतुकीच्या नियमांना केराची टोपली दाखवीत आता कोळसा व्यापारी कोळशाची वाहतूक विना ताडपत्री झाकताच करीत आहे. त्यामुळे परिसरात मोठय़ा प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. शिवाय यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना शारीरिक व्याधी देखील वाढत आहे. मात्र वाहतूक विभाग प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. 

कोळशाची वाहतूक करताना वरून ताडपत्री झाकणे आवश्यक आहे. वाहतूक करताना या कोळशाची धुळ हवेत पसरतात किंवा अनेकदा हा कोळसा वाहतूक करताना खाली पडतो. त्यामुळे अपघाताची शक्यता असते. इत्यादी कारणांमुळे कोळशाची वाहतूक करताना वरून ताडपत्री झाकून वाहतूक करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाला कोळसा व्यापारी व ट्रान्सपोर्ट धारक केराची टोपली दाखवीत आहेत.

कोळशाची ओव्हरलोड वाहतूक
कोळसा व्यापारी व ट्रान्सपोर्ट कंपन्या यांच्याकडून ट्रक ओव्हरलोड भरल्याने कोळशाचे काही दगड रस्त्यावरच पडतात. हा कोळसा रस्त्यावर पडल्यावर मागून येणाऱ्या वाहनाच्या चाकाखाली आल्याने या दगडाची भुकटी होऊन ती प्रदूषणास हातभार लावते. ज्यामुळे परिसरातील लोकांना अनेक प्रकारच्या गंभीर शारीरिक समस्या होत आहे. याची लवकरात लवकर दखल घ्यावी अशी मागणी सर्वसामान्य जनता करीत आहे. 

कोळशाच्या प्रदूषणाने अनेक आजार – डॉ. लोढा
आपल्या परिसरात कोळशाच्या प्रदूषणाने अनेकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम झाला आहे. श्वसनाचे आजार, दमा, त्वचेचे रोग, खाज येणे, डोळ्यांची जळजळ होणे, तसेच डोळ्यांचे विविध कोळसा प्रदूषणाने होत आहे. कोळशाचे मायक्रोकन पोटात गेल्याने आपल्या परिसरात नपुंसकता ही मोठया प्रमाणावर वाढलेली आहे. त्यामुळे अनेक नहिला पुरुष उपचारासाठी येत आहेत. पचन शक्तीवरही याचा परिणाम होतो, वारंवार वायरल इन्फेक्शन होण्याची समस्या वाढलेली आहे.

– डॉ महेंद्र लोढा, मेडिकल एक्सपर्ट

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.