टिकाराम कोंगरे यांचा वाढदिवशी पुस्तक तुला

31 हजारांचे स्पर्धा परीक्षेचे पुस्तके अभ्यासिकेला दान

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सामाजिक कार्यकर्ते, काँग्रेस नेते व यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष टिकाराम कोंगरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची पुस्तक तुला करण्षात आली. यावेळी 31 हजारांची पुस्तकं त्यांच्याकडून दान करण्यात आली. विवेकानंद अभ्यासिका यात हा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी मनोगत व्यक्त करताना टिकाराम कोंगरे म्हणाले की स्वतःचे आयुष्य कसं घडवायचं हे प्रत्येकाने ठरवायचं असतं. आजच्या युगामध्ये सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी धावताना दिसतो. मात्र हे युग स्पर्धेचे असल्यामुळे शिक्षणामध्ये प्रचंड स्पर्धा वाढली आहे, त्यातच जो कठोर परिश्रम घेतो त्याला यश नक्कीच मिळते. आज या ठिकाणी जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात आणि यशस्वी होतात, जे विद्यार्थी यशस्वी होऊन जिथे नोकरीला जातात. त्यांनी सुद्धा या अभ्यासिकेमध्ये येऊन भेट दिली पाहिजे आणि विद्यार्थी घडविण्याकरिता त्यांना मार्गदर्शन करून या अभ्यासिकेला पुस्तकांची मदत केली पाहिजे.

वजनापेक्षा अधिक पुस्तके दान
कोणताही अवाढ्याव्य खर्च न करता शिक्षणाला महत्त्व देऊन त्यांनी स्पर्धा परीक्षेकरिता लागणारे पुस्तके भेट दिली आहे. पुस्तक तुला करताना टीकाराम कोंगरे यांच्या वजनापेक्षा जास्त पुस्तके ही 31 हजार रुपयांचे पुस्तके भेट देण्यात आली आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य शंकर वऱ्हाटे होते.यांनी विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये आपल्या ध्येयाकडे सतत लक्ष देण्याची काम करावे तरच यशस्वी होऊ शकतो असे अध्यक्षीय भाषणात सांगितले.

पुस्तक तुला कार्यक्रमाला पुरुषोत्तम आवारी, वंदना आवारी, संजय खाडे, आशिष मोहितकर, डॉ. मोरेश्वर पावडे, प्रमोद वासेकर,तेजराज बोढे, मारोती ठेंगणे, वामन कुचणकर, प्रवीण खाणझोडे, रुपेश ठाकरे, मेघश्याम तांबेकर, ज्ञानेश्वर बेलेकर, संजय सपाट, काजल शेख, रुद्रा कुचंकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने करण्यात आले होते. प्रा. दिलीप मालेकर, प्रफुल भगत यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमाचे संचालन शंकर घुगरे व आभार निलेश भोस्कर यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.