हिवाळी अधिवेशनात संगणक परिचालकांचा मुद्दा उचलणार – आ. बोदकुरवार
आमदारांच्या घरासमोर संगणक परिचालकांचे धरणे आंदोलन
विवेक तोटेवार, वणी: संगणक परिचालक हे स्वतंत्र पद निर्माण करुन नियुक्ती द्यावी तसेच किमान वेतन मिळावे आदी मागण्यांसाठी संगणक परिचालकांचे सध्या राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून सोमवार 4 डिसेंबर रोजी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार यांच्या घरासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. या आंदोलनात त्यांनी आपल्या मागण्या नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मांडाव्यात, अशा आशयाचे निवेदन दिले. यावर आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार त्यांनी संगणक परिचालकांच्या मागण्या येत्या अधिवेशना उपस्थित करणार असल्याचा शब्द दिला.
महाराष्ट्र राज्यातील आपले सरकार सेवा प्रकल्पात सेवा देणारे संगणक परिचालक सध्या आर्थिक व मानसिक अन्याय सहन करीत आहे. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात होणाऱ्या अन्यायाविरुद्ध 8 नोव्हेंबर 2023 पासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. तसेच राज्यभरातील संगणक परिचालक सध्या आपापल्या मतदारसंघातील आमदारांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करीत आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून सोमवार 4 डिसेंबर रोजी वणीत देखील आमदारांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्रातील सर्व संगणक परीचालकांना आकृतिबंधात समाविष्ट करून मासिक वेतन देण्यात यावे, आकृतिबंधात समाविष्ट होईपर्यत मासिक 20 हजार रुपये वेतन देण्यात यावे, टार्गेट सिस्टीम पूर्णपणे बंद करण्यात यावे व दोन महिन्यांपासून थकीत असलेले मानधन देण्यात यावे या मागण्या प्रमुख आहेत. या मागण्यांचे निवेदन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना देण्यात आले. आमदारांनी संगणक परीचालकांच्या मागण्या होणाऱ्या हिवाळी आदिवेशनात मांडणार असल्याचे यावेळी शब्द दिला.
या आंदोलनात महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटना तालुका वणी संघटनेचे अध्यक्ष राजकुमार वडस्कर, उपाध्यक्ष विनोद सोनटक्के, सचिव सचिन देवतळे, अमोल दुबे, पूनम गोलाईत, सचिन बोधे, नितेश डोहे, प्रदीप मालेकर, चंदू सातपुते यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने संगणक परिचालक उपस्थित होते
Comments are closed.