मध्यरात्री बसस्थानक परिसरात आढळला संशयास्पद हालचाली करताना युवक

पोलिसांनी अटक करत दाखल केला गुन्हा

वणी बहुगुणी डेस्क: शिंदोला बसस्थानक परिसरातून बुधवारच्या मध्यरात्री एका संशयीत इसमाला शिरपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. सुहास उत्तम टेकाम (29) रा. कुर्ली असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास म्हणजे दिनांक 14 डिसेंबर रोजी शिरपूर पोलीस शिंदोला परिसरात पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान शिंदोला बसस्थानकावर अंधारात एक इसम लपलेला आढळला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी मोक्यावर जाऊन त्याला विचारणा केली. मात्र त्याला समाधानकारक उत्तरे देता आले नाही. त्यामुळे पोलिसांनी आरोपी सुहास टेकाम याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले. त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 122 नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास शिरपूर पोलीस करीत आहे.

Podar School 2025

Comments are closed.