मुकूटबन येथे राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धा

0

रफीक कनोजे,झरी: तालुक्यातील गुरुदेव सेवा मंडळ व समस्त ग्रामवासी मुकुटबन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४९ व्या पुण्यतिथी महोस्तवानिमित्त राज्यस्तरीय भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २० व २१ जानेवारीला सुंदरनगर पवार ले आउट श्री राम मंदिर मुकुटबन येथे ही भजन स्पर्धा होणार आहे.

२० जानेवारीला कार्यक्रमाला सुरवात होणार आहे. पहाटे ४ वाजता ग्रामसफाई, ध्यानप्रार्थना, प्रभातफेरी, रामधून पासून सुरवात होणार आहे. भजन स्पर्धेत चार गट आहेत. यात शहरी विभाग पुरुष गट, ग्रामीण विभाग पुरुष गट, महिला गट, व बाल गट असून पुरुष शहर व ग्रामीण गटाकरिता १० हजार ते १००० रुपयांपर्यंत ची बक्षिसे ठेवण्यात आले आहे. तर महिला व बाल गटाकरिता ५००० ते ६५० पर्यत चे बक्षिससह व्यक्तीगत बक्षिसाची लूट आहे.

खंजेरी भजनाचे उदघाटन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश वाघ राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून जि.प सदस्या संगीता मानकर, पं.स सभापती लता आत्राम, सरपंच शंकर लाकडे, उपसरपंच अरुण आगुलवार, ठाणेदार गुलाब वाघ, वनपरिक्षेत्र अधिकारी विजय वारे, दामोदर पाटील, सूर्यप्रकाश जयस्वाल, माणिकदास टोंगे महाराज, प्रा संजय पवार, सौ संध्या पवार, डॉ अशोक पुनसे, भूमरेड्डी बाजनलावार, सुरेश मानकर, प्रमोद बरशेट्टीवार, रमेश पोटराजवार, चक्रधर तिर्थगिरीकर, संदीप बुरेवार ,संदीप विचू, गणेश उदकवार, बापूराव जिन्नावार, अनिल पावडे, करमचंद बघेले राहणार असून परिसरातील खंजेरी भजन मंडळांनी सहभाग घेण्याचे आवाहन अध्यक्ष डॉ प्रेमनाथ लोडे, रामदास पारशीवे, शंकर राहुलवार, गजानन पालकोंडवार, सत्यनारायण यमजलवार, देवराव जिनावार, मनोज जेउरकार , विजय थेट, मनोहर कडूकर , नामदेव जनगमवार, सह आयोजकांनी केली आहे. ह्या राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेत जास्तीत जास्त भजन मंडळानी सहभाग घावा असे आयोजंकाकडुन आवाहन करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.