शिवपुराण कथास्थळाचे भूमिपूजन, तयारी अंतिम टप्प्यात

शेवाळकर परिसरात कार्यालयाचे उदघाटन, सेवा व सहकार्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

बहुगुणी डेस्क, वणी: 26 जानेवारीला पं. प्रदीप मिश्रा यांच्या आगमनानिमित्त भव्य शोभायात्रा निघणार आहे. श्री काशी शिवपुराण कथेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या कथेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा (सिहोर वाले) हे शिवपुराण कथा वाचन करणार आहे. या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्याकडे आली आहे. वणी जवळील पळसोनी येथे दिनांक 27 जनवरी ते 2 फरवरी 2024 दरम्यान ही कथा होणार आहे. नुकतेच मुख्य आयोजक राजकुमार जयस्वाल यांनी कथास्थळाचे सपत्निक पूजन केले. यावेळी माजी खासदार तथा राष्ट्रीय मागास आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते सभास्थळाचे कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, मनसे नेते राजू उंबरकर, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, विजय चोरडिया, मुन्ना महाराज तुगनायत, देविदास काळे, टीकाराम कोंगरे, पम्माशेठ, निकेत गुप्ता, अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारुन कार्याला विधिवत सुरवात करण्यात आले. यावेळी पांढरकवडा, चंद्रपूर येथील तसेच लाल पूलीयाचे व्यापारी, वणीतील गण मान्य नागरिक उपस्थित होते. दरम्यान शेवाळकर परिसर येथे शिव कथा पुराण कार्यालयाचे उदघाटन आमदार संजीवरेड्डीजी बोदकुरवार यांच्या हस्ते करण्यात आले.

वणी व परिसरातील हजारो शिवभक्तांच्या सहकार्याने शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. यवतमाळ रोडवरील पळसोनी फाटा परिसरात 25 एकर परिसरात कथा मंडप तयार करण्यात येणार आहे. येणाऱ्या भाविकांच्या भोजन व महाप्रसादाची व्यवस्था 10 एकर जागेत करण्यात येणार असून केवळ वाहने पार्क करण्यासाठी 20 एकरचे भव्य पार्किंग तयार करण्यात येणार आहे. 

शहरातील सुप्रसिद्ध व्यावसायिक व शिवभक्त राजकुमार जयस्वाल व त्यांच्या पत्नी शिवभक्त श्रद्धा जयस्वाल यांच्या पुढाकारातून तसेच परिसरातील शिवभक्तांच्या साथीने श्री काशी शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान कार्यालय सेवा व सहकार्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आवाहन राजकुमार जयस्वाल व श्रद्धा जयस्वाल यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे सर्व पदाधिकारी आणि वणीतील विविध संस्था परिश्रम घेत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.