यामहाशिवरात्रीला भक्तांनीच केला अनोखा चमत्कार…..

भगवान शिवाचा त्रिशूल उडत होता आणि भक्त झालेत अवाक...‌.

पुरुषोत्तम नवघरे, वणी: देव नेहमीच चमत्कार करीत असतात. या शिवरात्रीला मात्र भक्तांनीच फार मोठा चमत्कार केला. थोडा थोडका नव्हे तर तब्बल 251 किलोचा त्रिशूल भक्तांनी आपल्या खांद्यावर घेतला. विषय इथंच संपला नाही. हा अडीचशे किलोचा त्रिशूल घेऊन भक्त तब्बल 15 किलोमीटर पायी निघाले. शिरपूर येथील शिव मंदिरात भगवान महादेवाच्या दर्शनासाठी.

Podar School 2025

पर्व महाशिवरात्रीचे. भक्ती आणि उत्साला उधाण आलेलं होतं. ही त्रिशूल यात्रा येथील बसस्थानकाजवळील हनुमान मंदिरापासून सकाळी निघाली. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा वणीचे माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या संकल्पनेतून निघालेल्या या पदयात्रेत 251 किलोंचा त्रिशूल खांद्यावर घेऊन हजारो भाविकांसह वणी ते शिरपूर अशी पदयात्रा अतिशय उत्साहात काढण्यात आली. केंद्रीय मागास आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी चारगाव चौकीवर येऊन सर्व भाविकांची भेट घेतली व ते या यात्रेत सहभागी झाले. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार या यात्रेत सहभागी झाले होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मागील वर्षीपासून वणी ते शिरपूर अशी त्रिशूल यात्रा काढली जात आहे. यावर्षी उडता त्रिशूल व दिल्ली येथील शिवतांडव हे यात्रेचे प्रमुख आकर्षण होते. शिवाय स्थानिक कलावंतांनीसुद्धा आपल्या कलांचे प्रदर्शन केले. या त्रिशूल यात्रेत सहभागी भाविकांसाठी अभिषेक करण्यासाठी वाराणसी येथून आणलेले पवित्र गंगाजल उपलब्ध करून दिले गेले. या पदयात्रेत जैन ले- आऊट, आंबेडकर चौक, गणेशपूर, गोकुळनगरसह शहरातील हजारो शिवभक्त व वणी ते शिरपूर मार्गावरील गावांतील भाविक सहभागी झाले होते. मोटरस्टँड जवळील हनुमान मंदिरातून निघालेली ही भव्य रॅली टिळक चौक, खाती चौक, गांधी चौक, भगतसिंग चौक, रंगनाथस्वामी मंदिर, गोकुळनगर, लालगुडा चौपाटी ते शिरपूर पर्यंत पोहचली.

या यात्रेच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे अध्यक्ष तारेंद्र बोर्डे, प्रशांत भालेराव, गजानन कासावार, नीलेश परगंटीवार, कुणाल चोरडिया, अनिल अक्केवार, बंडू चांदेकर, नीलेश पोल्हे, जयेश चोरडिया, मनीष गायकवाड, सारंग बिहारी, निखिल खाडे, गुंजन इंगोले, शरद ढुमणे, सुभाष बिलोरिया, अनिल रेभे, मंगेश झाडे, किशोर बावने सह शिवभक्तांनी परिश्रम घेतले.

Comments are closed.