– रवी ढुमणे
यवतमाळ: जिल्ह्यातील वणी या लहानशा गावात मातीच्या मुर्त्या तयार करणारे सुप्रसिद्ध मूर्तिकार सुधाकर यांच्या अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या तरुण मुलाने देशातील प्रदूषणावर मार करण्यासाठी इको फ्रेंडली गणपती तयार करण्याचा पुण्यात व्यवसाय सुरू केला आहे. ऑनलाइन गणपती मिळण्यासाठी Mangalasudha.com हे संकेतस्थळ तयार करून व्यवसायाला सुरुवात केली आहे. परिणामी देशातील ग्राहकांना आता गणेशा च्या मुर्त्या थेट ऑनलाईन मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील वणी हे तालुक्याचे ठिकाण आहे. या गावात सुधाकर बुरडकर हे मातीच्या मुर्त्या तयार करणारे मूर्तिकार आहेत. अगदी आकर्षक अश्या सुबक मुर्त्या तयार करणारे कलाकार म्हणून त्यांची ख्याती आहे. स्पर्धेच्या युगात मातीच्या मुर्त्या तयार करणारे कलाकार देशपातळीवर कुठेही मागे पडू नये यासाठी त्यांचा अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या मनीष बुरडकर या तरुणाने परिसरातील युवा मूर्तिकारांना संघटित करून मंगल सुधा नावाचे अप्स तयार केले आहे. यात मनीष च भाऊ पंकज बुरडकर, मित्र रितेश साखरकर यांच्या मदतीने मंगल सुधा क्रिएशन नावाची कला संस्था पुण्यात सुरू केली आहे.
ग्रामीण भागातून अभियांत्रिकीला शिकायला गेलेल्या मनिषने मित्रांना संघटित करून प्रदूषणावर मात करण्यासाठी मातीचे गणपती कसे फायदेशीर ठरते याचा प्रसार आणि प्रचार केला आहे. मंगल सुधा या संस्थेने दर्जेदार व ग्राहक समाधानासाठी विशेष नामांकन सुध्दा मिळविले आहे. मनीष वणी शहरातील सुप्रसिद्ध मूर्तिकार सुधाकर बुरडकर यांचा मुलगा आहे. वडिलांच्या कलेला देशपातळीवर वाव मिळावा यासाठी तो प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. तसेच ग्रामीण भागातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी मनीष धडपड करीत आहे. त्याचा भाऊ म्हणतोय मूर्तिकला शिकण्यासाठी ४ ते ५ लाख रुपये खर्च होतात. कलाकारांना नवीन दिशा मिळण्यासाठी मंगलसुधा नावाचे अँप तयार केले असून या अँपमुळे देशातील ग्रामीण भागातील कलाकारांना नवी दिशा मिळेल असा त्यांचा मानस आहे. कला जिवंत ठेवण्यासाठी व ग्रामीण भागातील मातीच्या मुर्त्या तयार करणाऱ्या कलाकारांना या अँप मुळे नक्कीच प्रेरणा मिळणार आहे. Mangalsudha.com हे संकेतस्थळ आपण आल्या सर्च बार वर टाकताच थेट मंगलसुधा कला संग्रहालय दिसेल तिथे तेथे आपल्याला आवडलेल्या मूर्तीला ऑनलाइन विकत घेण्याची सुविधा सुद्धा यात तयार करण्यात आली आहे. व सोबतच घरपोच मुर्त्या सुद्धा मिळणार आहे. त्यासाठी गूगल प्ले स्टोर वर अँप उपलब्ध करण्यात आल्याची माहिती बुरडकर यांनी दिली आहे.
ग्रामीण भागातील कलेला देशपातळीवर चालना मिळण्यासाठी वणीतील युवकांनी संघटित होऊन इको फ्रेंडली गणपती तयार करण्याचा व्यवसाय पुण्यात सुरु केला आहे. या मंगलसुधा क्रिएशन चे व्यवस्थापकीय संचालक मनीष बुरडकर , क्रिएटिव्ह हेड पंकज बुरडकर व ज्येष्ठ मूर्तिकार सुधाकर बुरडकर यांनी संपूर्ण माहिती दिली आहे . पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी इको फ्रेंडली गणपती तयार करून या तरुणांनी थेट पुण्यात भरारी घेतली आहे.
नदीपात्रातील मातीला प्रथम प्राधान्य
मंगलसुधा कला केंद्रात तयार केले जाणारे गणपती हे नदी पात्रात साचलेल्या चिखलमती पासून बनविण्यात आले आहे. हि माती नैसर्गिक आहे म्हणून मातीचे गणपती इको फ्रेंडली आहेत. नैसर्गिक माती पुन्हा वापरात आणता येईल त्यासाठीच या गणपतीला प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे . ग्राहकांनी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी मातीच्या गणपतीची खरेदी करण्याचे आव्हान करीत आहे.
– मनीष सुधाकर बुरडकर ( अभियंता )
व्यवस्थापकीय संचालक मंगल सुधा क्रिएशन
8275301812