शिवकालीन शस्त्रास्त्रांच्या प्रात्यक्षिकांचा थरार या गुढीपाडव्याला

शिवतीर्थावर होईल सार्वजनिक गुढीपूजन, स्वराज्य युवा संघटनेचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात विविध शस्त्र आणि अस्त्रांचा वापर होत असे. ती शस्त्रास्त्र कशी होती, ती कशी चालवतात हे वणीकरांना प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे, मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2014 ला गुढीपाडवा आहे. या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सकाळी 9 वाजता याची प्रात्यक्षिके होतील. गेल्या 11 वर्षांपासून गुढीपाडवा उत्सव समिती सार्वजनिकरीत्या हा सण साजरा करतात. याही वर्षी स्वराज्य युवा संघटनेद्वारा छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिवतीर्थ येथे गुढीपाडवा उत्सव साजरा होणार आहे.

गुरुदेव सेवा मंडळाचे यवतमाळ जिल्हा प्रचार प्रमुख मारुती ठेंगणे यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता गुढीचे पूजन होईल. यावेळी बिल्डर आणि डेव्हलपर्स किरण दिकुंडवार, गुढीपाडवा समितीचे विवेक पानघटे प्रामुख्याने उपस्थित राहतील. शिवआनंद लाठी-काठी ग्रुप हे शिवकालीन शस्त्रविद्येचे प्रदर्शन करतील.

महादेव नगर, चिखलगाव येथील साईकृपा प्रोजेक्टच्या वतीने महाप्रसाद म्हणजेच घुगरी वाटप होईल. अखिल भारतीय माळी महासंघ, धोबी समाज सामाजिक संस्था, आर्य वैश्य समाज संस्था, बेलदार समाज संस्था, तेली समाज महासंघ, कुणबी समाज संस्था, एरंडेल तेली समाज संस्था, महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ, जैन कलर समाज संस्था, ब्राह्मणसभा, त्रिवेदी मेवाड ब्राह्मण समाज, शिंपी समाज संस्था, धनोजे कुणबी समाज संस्था, भारतीय सुवर्णकार समाज संस्था, पद्मशाली समाज,

संत रविदास चर्मकार समाज, पेरकी समाज संस्था, धनोजी कुणबी युवा मंच, जैन श्रावक संघ, मातंग समाज संस्था, विश्वकर्मा झाडे सुतार समाज, मेहतर समाज संस्था, भावसार समाज संस्था, पाराशर ब्राह्मण समाज संस्था, पूज्य सिंधी पंचायत, धनगर समाज संस्था, लोहार समाज संस्था, गोजकी समाज संस्था, पहाड वनमाळी समाज, भोई समाज, बारी समाज, सरोदे समाज, भाट समाज, गुरव समाज, नाथजोगी समाज, पांचाळ समाज, गांडली समाज, बंजारा समाज, गोवारी समाज, क्षत्रिय छिपा समाज, कोष्टी समाज, ओतारी समाज, अग्रवाल समाज हे गुढीपाडवा उत्सव समितीत आहेत.

आयोजन समितीची जबाबदारी विवेक पानघाटे, अमर चौधरी, रवींद्र गौरकर, रवी धुळे, आशीष आगबत्तलवार, अंकुश बोढे, राहुल चौधरी, प्रफुल्ल कोल्हे, नीलेश कोसारकर, नितीन ठावरी, मोहित रुईकर, सुरेंद्र नालमवार, पुनीत रुईकर, नितीन दोडके, विकास देवतळे, राहुल खारकर, आदित्य शेंडे, किसन कोरडे, सारंग बिहारी, अमोल मोहितकर, जनार्दन थेटे, भरत बोबडे, राकेश पराये. स्वप्निल पिंपळशेंडे. कुणाल बोबडे, अनिरुद्ध देशपांडे, नितीन पडोळे, किशोर मंथनवार, संजय कावडे, बालाजी भेदोडकर, रोशन चिंचोळकर, मनोज बिजवे यांनी उचलली. या आयोजनासाठी संजय खाडे आणि संगीता संजय खाडे यांचेदेखील विशेष सहकार्य लाभले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.