नातेवाईक कॉल करून त्रस्त, पण मुलीने फोन उचलला नाही….

कॉलेज कुमारिका बेपत्ता, फूस लावून पळवून नेल्याची शंका

विवेक तोटेवार, वणी: कॉलेजमध्ये 11 वीत शिकणारी तालुक्यातील एक कुमारिका घरून निघून गेली. शनिवारी दिनांक 26 एप्रिल रोजी दुपारी ही घटना घडली. मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जात असून मुलीच्या काकूच्या तक्रारीवरून वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, पीडित मुलीचे आई व वडील हे काही वर्षांपूर्वी मरण पावले. त्यानंतर ती आपल्या काकुजवळ राहते. सोबत काकूंची आई सुद्धा राहते. मुलगी ही चंद्रपूर येथे 11 वीला शिक्षण घेते. सध्या कॉलेजला सुटी लागल्याने ती आपल्या काकूंच्या गावी आली.

26 एप्रिल रोजी मुलीची आजी ही नातेवाईकांकडे चंद्रपूर येथे गेली होती. तर मुलीची काकू ही कामावर गेली होती. दु. 12 वाजताच्या सुमारास एका शेजारी राहणाऱ्या महिलेने मुलगी ही बॅग घेऊन घरून निघून गेल्याचे सांगितले. काकू घरी आल्या व बघितले असता मुलगी आढळून आली नाही. तिला फोन केला असता ती फोन उचलत नव्हती.

मुलीच्या काकूने नातेवाईकांना फोन करून मुलीबाबत विचारणा केली. परंतु मुलगी मिळून आली नाही. कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याची शंका काकूला आली. त्यामुळे शेवटी मुलीच्या काकूच्या तक्रारीवरून वणी पोलिसात कलम 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीचा शोध वणी पोलीस करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.