चोरट्यांचा पुन्हा हैदोस, एकाच रात्री फोडली दोन घरं

रोख रक्कम व सोने लंपास, घर बंद म्हणजे घरफोडी...

बहुगुणी डेस्क, वणी: शहरात होणारी घरफोडी अद्यापही थांबलेली नाही. वणीत गुरुवारी मध्यरात्री (शुक्रवारी) मोरोती टाऊनशीप व छोरिया ले आउट येथे घरफोडी झाली. मारोती टाऊनशीप येथील घरी चोरट्यांनी सोने व रोख रक्कम असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. तर छोरीया ले आऊट येथील घरफोडीत चोरट्यांनी किती डल्ला मारला याची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही.

धनराज केशव सिडाम (40) हे मारुती टाऊनशीप वणी येथील रहिवासी आहे. त्यांची राजुली ता. मुल जिल्हा चंद्रपूर येथे शेती आहे. त्यांच्या पत्नी एमएसईबी विभागात नोकरीला असल्याने ते गेल्या वर्षांपासून वणी येथे घर विकत घेऊन तिथे शिफ्ट झाले. गावी शेती असल्याने धनराज हे नेहमी राजुली येथे शेतीच्या कामासाठी जात होते. आठ दिवसांआधी ते राजूली येथे गेले. गुरुवारी त्यांनी त्यांच्या पत्नी व मुलालाही गावी बोलवले. त्यामुळे संध्याकाळी त्यांच्या पत्नीने घराला कुलूप लावून त्या मुलाला सोबत घेऊन राजूली येथे गेल्या.

शुक्रवारी सकाळी शेजा-यांना धनराज यांचे घर फोडलेले दिसले. त्यामुळे शेजा-यांनी तातडीने याची माहिती त्यांना दिली. माहिती मिळताच सिडाम कुटुंबीय तातडीने गावाहून घरी पोहोचले. तेव्हा त्यांना घराच्या मुख्य दरवाज्याला लावलेला कोंडा तुटलेला आढळला. त्यांनी घराच्या आत जावून पाहिले असता त्यांना कपाटातील व बेडवरील सामान अस्तव्यस्त आढळले. चोरट्यांनी लॉकर फोडून अंगठी, चैन, मणी, कानातील टॉप किंमत 49, 300 रुपये व नगदी 16 हजार रुपये असा एकूण 65300 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

याबाबत धनराज यांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 380 व 457 नुसार गुन्हा दाखल केला आहे. बंद घर म्हणजे घरफोडी असे समिकरण झाले आहे. घरफोड्या बंद न झाल्याने वणीकर चांगलेच दहशतीत आहे.

Comments are closed.