वणीत आज खा. प्रतिभा धानोरकर यांची विजयी रॅली

सं. 6 वाजता निघणार रॅली व त्यानंतर सभेचे आयोजन

बहुगुणी डेस्क, वणी: आज गुरुवारी दिनांक 6 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता वणीत चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांची विजयी रॅली व कार्यकर्ता संवाद सभेचे आयोजन करण्यात आले आहे. विजयानंतर पहिल्यांदाच त्या वणीत येत आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांतर्फे त्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. या विजयी रॅली व सभेला मविआ, इंडिया आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन संजय खाडे व काँग्रेस कमिटी वणी विधानसभा क्षेत्रातर्फे करण्यात आले आहे.

Podar School 2025

तिकीट जाहीर होण्यास विलंब, शेवटच्या क्षणी तिकीट जाहीर होणे, निवडणुकीच्या तयारीला पुरेसा वेळ न मिळणे, समोर सुधीर मुनगंटीवार यांच्या सारखा दिग्गज उमेदवार असणे इत्यादी आव्हान असतानाही प्रतिभा धानोरकर यांनी मुनगंटीवार यांच्यावर एकतर्फी व दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर प्रतिभा धानोरकर या पहिल्यांदाच वणीत येत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांतर्फे त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

आधी रॅली नंतर कार्यकर्ता संवाद सभा
संध्याकाळी 6 वाजता प्रतिभा धानोरकर यांचे स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर शीवतीर्थ (टिळक चौक) येथून विजयी रॅलीला सुरुवात होणार आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण केल्यानंतर याच ठिकाणी रॅलीचा समारोप होणार आहे. त्यानंतर कार्यकर्ता संवाद सभा होणार आहे.

या रॅलीला सभेला मविआ, इंडिया आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन संजय खाडे व काँग्रेस कमिटी वणी विधानसभा क्षेत्रातर्फे करण्यात आले आहे.

Comments are closed.