गळफास घेऊन विद्यार्थ्याने संपवली जीवनयात्रा

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील मोहूर्ली गावाजवळील एका झाडाला एक विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. वैभव संजय येरकाडे (17) रा. मोहूर्ली असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. संजय येरकाडे हे आपल्या कुटुंबासह वणी तालुक्यातील मोहूर्ली या गावात राहतातम. ते मजुरी करतात. पत्नी , एक मुलगी व दोन मुले असा त्यांच परीवार आहे. मोठा मुलगा वैभव हा 12 वित वणीतील महाविद्यालयात शिक्षण घेत होता. मंगळवार 18 जून रोजी संजय हे कामाकरिता चारगाव येथे गेले होते. दरम्यान वैभव याने गावातील एका शेतातील नाल्याजवळ असलेल्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेतल्याचे आढळून आले. याबाबत पोलिसांनी माहिती दिली असता त्यांनी वैभवाला वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वैभवने हे टोकाचे पाऊल का उचलले हे समजू शकले नाही.

Podar School 2025

Comments are closed.