आज चालतं फिरतं जनहित केंद्राचे उद्घाटन

आता विविध योजनांच्या लाभासाठी होणार नागरिकांना मदत

बहुगुणी डेस्क, वणी: आज चालतं-फिरतं जनहित केंद्राचे स. 11 वाजता खाती चौक येथे उद्घाटन होणार आहे. संजय रामचंद्र खाडे यांच्या पुढाकारातून दिवंगत खा. बाळू धानोरकर यांच्या जयंती दिनी हे सेवा केंद्र सुरु करण्यात येणार आहे. या जनहित केंद्राद्वारे सर्वसामान्यांना शासकीय योजनेसाठी लागणारी विविध तांत्रिक मदत केली जाणार आहे. या केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय रामचंद्र खाडे यांनी केली आहे.

काय आहे चालतं फिरतं (मोबाईल) जनहित केंद्र?
शासनाच्या विविध योजना असतात. त्यासाठी विविध कागदपत्र तसेच तांत्रिक बाबींची पुर्तता करणे गरजेचे असते. मात्र अनेकांना याबाबत संपूर्ण माहिती नसते. शेतकरी, शेतमजूर, महिला, युवा, दिव्यांग इत्यादींना या जनहित केंद्राद्वारे शासकीय योजनेचा लाभ घेण्यास जी काही तांत्रिक मदत लागते ती मदत केली जाणार आहे.

कसा करावा संपर्क ?
हे जनहित केंद्र 24 तास सुरु राहणार आहे. ज्यांना याची गरज असले त्यांना केवळ 9637375455 या क्रमांकावर संपर्क साधावा लागणार आहे. संपर्क करताच जनहित केंद्राची टीम तुमच्या गावात किंवा तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी पोहोचणार. ही टीम लाभार्थ्यांना आवश्यक ती तांत्रिक मदत पुरवणार.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

काय होणार फायदा?
शासनाच्या विविध योजना असतात. मात्र अनेकदा या योजनेचा लाभ कसा घ्यावा? त्यासाठी कोणती कागदपत्र जोडावी, ऑनलाईन अप्लाय करण्याची पद्धत याची माहिती लाभार्थ्याला नसते. त्यामुळे तो लाभार्थी योजनेपासून वंचित राहतो. अशा व्यक्तींना या जनहित केंद्राद्वारे मदत केली जाणार आहे.

 

Comments are closed.