बहुगुणी डेस्क, वणी: निर्गुडा नदीवरील रेल्वे पुलावर एका धावत्या रेल्वेने तरुणाला धडक दिली. या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. आदित्य रवि दुर्गे (20) असे मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवारी दिनांक 6 जून रोजी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आदित्य हा दामले नगर येथील रहिवासी होता. रात्रीच्या सुमारास तो घराजवळील निर्गुडा नदीच्या रेल्वे पुलावर गेला होता. त्याच वेळी तेलंगणा एक्सप्रेस ही जात होती. या रेल्वेने आदित्यला धडक दिली. हा अपघातात आदित्यचा पाय रेल्वेच्या रुळाखाली चिरडला गेला व तो जागीच ठार झाला. आदित्यने आत्महत्या केली की हा अपघात आहे, याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आदित्यचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Comments are closed.