लाडकी बहीण योजनेचे नि:शुल्क नोंदणी फॉर्म भरणे सुरू

आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा उपक्रम, योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

विवेक तोटेवार, वणी: आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नोंदणी फॉर्म निःशुल्क भरून देण्यात येत आहे. हा उपक्रम 8 जुलैपासून सुरु करण्यात आला आहे. या योजनेचे फॉर्म निःशुल्कपणे बसस्टॉप समोर, टिळक चौक, दीपक चौपाटी, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान जवळ, इंगोले मेडिकलजवळ, राम शेवाळकर परिसर या ठिकाणी भरून देणे सुरु आहे.

Podar School 2025

योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र किंवा 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला यापैकी कोणतेही एक, उत्पन्नाचे प्रमाणपत्र (2.50 लाख उत्पन्न मर्यादेपर्यंतेचे) किंवा पिवळे व केशरी रेशन कार्ड (केशरी व पिवळे रेशनकार्ड धारकासाठी उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही) , परराज्यातील जन्म झालेली महिला असल्यास किंवा महाराष्ट्रातील पुरुषासोबत विवाह झाला असल्यास पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यासोबत बँक खात्याच्या पासबुकची पहिल्या पानाची छायांकित प्रत, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो आवश्यक आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व पात्र महिलांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले आहे

Comments are closed.