आदर्श विद्यालयात कला व क्रीडा महोत्सव संपन्न
वणी (विलास ताजने): वणी येथील आदर्श विध्यालयात नुकताच कला व क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला. सहा दिवस चाललेल्या या महोत्सवात विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १८ जानेवारीला उद्धघाटन सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे उद्धघाटन डॉ. सुनील जुमनाके यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक समितीचे सचिव तथा कार्यकारी अध्यक्ष जयसिंगराव गोहोकार होते. प्रमुख पाहुणे म्हणून बालरोगतज्ज्ञ डॉ. सुवर्णा मानकर, मराठी विज्ञान परिषद वणीचे अध्यक्ष महादेव खाडे, मुख्याध्यापक सुरेश घोडमारे, साधनाताई गोहोकार उपस्थित होते.
क्रीडा महोत्सवात कबड्डी, लंगडी, खोखो, धावणे, गोळा फेक आदी खेळ, रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, हस्ताक्षर स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, एकल नृत्य आणि समुह नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. २० जानेवारीला बक्षीस वितरण करण्यात आले. सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.