ढोकी (वाई) येथील नागरिकांचा मार्ग झाला सुकर
सामाजिक कार्यकर्ते नीलेश चौधरी यांच्या प्रयत्नाला यश
मारेगाव – तालुक्यापासुन काही अंतरावर असलेल्या दोन विघानसभेच्या सीमेवर असलेले ढोकी (वाई) या गावाला अनेक समस्येंनी ग्रासले आहे, रस्ते, पाणी, विज यापासून सर्वसामान्यांना वंचित राहावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते नीलेश चौधरी यांनी पुढाकार घेत रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा केला. परिणामी ढाको (वाई) ते करंजी हा मार्ग तयार झाला आहे.
ढाको गावाच्या सर्वात जवळची बाजारपेठ करंजी (रोड) आहे. ही अवघ्या ३ कि.मी. च्या अंतरावर आहे. परंतु या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यात जागो-जागी खड्डे पडले आहे. त्यामुळे या रस्त्यांनी ये-जा करणे कठीण झाले आहे. ढोकी गावालत असलेल्या ओढ्यानजिक अनेक दुचाकीस्वारांचे अपघात झाले आहेत.
ही बाब लक्षात घेत सामाजिक कार्यकर्ते नीलेश चौधरी यांनी पुढाकार घेतला. या ओढ्याजवळ मुरुम टाकण्यासंदर्भात ग्रामपंचायतेकडे मागणी केली. मागणीसाठी सतत पाठपुरावा केला. अखेर काम मंजूर झाले व एका दिवसात मुरुम टाकुन ढोकी (वाई) येथील नागरीकांचा मार्ग सुकर झाला.
नीलेश चौधरी यांच्या कार्यमुळे गावक-यांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी युवा ब्रिगेड मंगल राऊत, विशाल बोंडे, राम चिकनकर, कुणाल चौधरी, निखिल चिकनकर, रोशन राऊत, चेतन चिकनकर यांच्यासह मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते.
Comments are closed.