विवेक तोटेवार, वणी: दुपारी 12 वाजताची वेळ… वणी बसस्थानकावरून एक व्यक्ती 112 या हेल्पलाईनवर पोलिसांना कॉल करतो… बसस्थानकात बॉम्ब असल्याची माहिती देतो… पोलीस घटनास्थळी दाखल होतात… बॉम्ब पथक येतं…. आता सर्वांच्या नजरा बेवारस बॅगवर… हा थरार वणीकरांनी आज दुपारी अनुभवला… हा थरार बघण्यासाठी बसस्थानकावर एकच गर्दी झाली होती.. शनिवारी दिनांक 10 ऑगस्ट रोजी यवतमाळ येथील पोलीस दलाने वणी बसस्थानकावर बॉम्ब निकामी करण्याचे प्रात्यक्षिके करण्यात आले.
आगामी सण उत्सव लक्षात घेता हे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. वणी बसस्थानकावरून एका व्यक्तीने एक बेवारस बॅग पडून असल्याचे 112 वर फोन करून सांगितले. त्यानंतर पोलीस दलाद्वारे तातडीने पाऊल उचलत तात्काळ वणी बसस्थानकावर हजर झाले व लोकांना या बेवारस बॅगपासून दूर राहण्यास सांगण्यात आले. बॉम्ब शोधक पथकाला माहिती देण्यात आली. अग्निशामक दलाल याबाबत माहिती देण्यात आली.
लवकरच बॉम्ब पथक वणी बसस्थानकावर दाखल झाले व त्यांनी पोलिसांच्या मदतीने एक सुरक्षित अंतरावर घेरा बनविला. बॉम्ब शोधक पथकाने कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेतली. श्वान पथकाने संपूर्ण परिसर शोधून काढला व अजून कुठे काही अजून मिळते काय याची तपासणी केली. लोकांना या बेवारस बॅगपासून दूर ठेऊन हा बॉम्ब निकामी करण्यात आला. एकदम वणीकरांना खरेच वाटावे अशी ही रंगीत तालीम वणीच्या बसस्थानकावर घेण्यात आली.
सदर तालीम ही पोलीस अधीक्षक पवन बन्सोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव पोलीस स्टेशन, शिरपूर पोलीस स्टेशन यांच्याबरोबर पोउनि सारंग बोंम्पीलवार प्रमुख दाहशदवाद शाखा यवतमाळ, पोऊनी परांड बॉम्ब शोधक व नाशक पथक, पोऊनी धवने प्रमुख QRT पथक यवतमाळ, वणीचे पोलीस निरीक्षक अनिल बेहराणी, सपोनि सीता वाघमारे वाहतूक शाखा सपोनि सुरेश परसोडे, अंगुलीमुद्र वैद्यकीय अधिकारी, अग्निशामक दल यांनी केली.
Comments are closed.