अपघात – भरधाव दुचाकी स्लीप… चालकाचा मृत्यू

वणी-वरोरा बायपासवरील घटना

विवेक तोटेवार, वणी: भरधाव असलेल्या दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने एका दुचाकी चालकाचा वणी-वरोरा बायपासजवळ भीषण अपघात झाला. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. वणी-वरोरा बायपास वरील वडगाव टी पॉईंटवर हा अपघात झाला. बंडू नामदेव जोगी (45) असे मृताचे नाव आहे.

बंडू हे लालगुडा येथील रहिवासी आहेत. ते लालपुलिया परिसरात एका ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करीत होते. बुधवारी दिनांक 14 ऑगस्ट रोजी आपली ड्युटी संपल्यावर ते रात्री 9 वाजताच्या सुमारास आपली दुचाकी (MH34 BA2416) ने घरी लालगुडा येथे परतत होते. यावेळी वडगाव टी पॉईंट जवळील वळणारव त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यांची दुचाकी रस्त्यावर वेगाने आदळली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली व रस्तस्राव झाला. अपघात झाल्यानंतर बराच काळ ते तिथे एकटेच पडून होते. नंतर काही लोकांनी याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना दिली. नागरिकांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. त्यांच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Comments are closed.