शेतकरी न्याय यात्रा वणी तालुक्यात, भांदेवाडा येथून सुरुवात

खा. प्रतिभा धानोरकर यांनी दाखवली यात्रेला हिरवी झेंडी.... विधानसभा क्षेत्रात निकृष्ट कामे, आशिष खुलसंगे यांचा आमदारांवर हल्लाबोल

विवेक तोटेवार, वणी: शेतक-यांच्या विविध समस्या आणि वणी विधानसभा विविध प्रश्नांवर शेतकरी न्याय यात्रा सुरु करण्यात आली आहे. या यात्रेला विधानसभा क्षेत्रातील नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी दिनांक 16 ऑगस्ट पासून या यात्रेचा वणी तालुक्याचा दौरा सुरु झाला. शुक्रवारी भांदेवाडा येथे खा. जगन्नाथ महाराज मंदिर येथे दर्शन घेऊन यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी खा. प्रतिभा धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढील 3 ते 4 दिवस वणी तालुक्यातील संर्व सर्कलचा दौरा करून वणी येथे या यात्रेची सांगता होणार आहे.

सकाळी 11.30 वाजता भांदेवाडा येथील विदेही सदगुरू श्री जगन्नाथ महाराज संस्थान येथे पूजन करण्यात आले. त्यानंतर खा. प्रतिभा धानोरकर यांनी यांत्रेला हिरवी झेंडी दाखवली. पाऊस सुरु असतानाही काँग्रेसचे कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक यात्रेत उत्स्फुर्तपणे सहभागी झाले. त्यानंतर ही यात्रा राजूर, पळसोनी, मुर्धोनी, मोहुर्ली, विरकुंड, बोर्डा, साखरा, घोन्सा, रासा येथे गेली. या यात्रेचे गावोगावी स्वागत करण्यात आले. बोर्डा, घोन्सा, साखरा इत्यादी ठिकाणी सभा घेण्यात आल्या. यात्रेचे मार्गदर्शक व माजी आमदार वामनराव कासावार व यात्रेचे मुख्य संयोजक आशिष खुलसंगे यांनी यात्रेची भूमिका स्पष्ट केली. सभेत त्यांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व महायुती सरकारवर हल्लाबोल केला. कायर येथे यात्रेची दिवसाची सांगता झाली.

 

10 वर्षात विधानसभा श्रेत्रात निकृष्ट कामे – आशिष खुलसंगे
आमदार साहेब हे संपूर्ण विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत. मात्र ते विकास कामात भेदभाव करीत आहे. त्यामुळे एका भागात काम आणि इतर भागात विदारक परिस्थिती दिसून येते. गेल्या 10 वर्षात वणी विधानसभा क्षेत्रात जे थोडे फार काम झालेत. त्यातील अधिकाधिक कामे हे निकृष्ट दर्जाचे आहेत. रस्त्यांना एका वर्षात खड्डे पडत आहे. असा हल्लाबोल आशिष खुलसंगे यांनी यात्रेतील सभेतून आमदारांवर केला.

शेतकरी न्याय यात्रेत ऍड देविदास काळे, काँग्रेसचे वणी तालुका अध्यक्ष घनश्याम पावडे, नरेंद्र ठाकरे, संध्या बोबडे, डॉ महेंद्र लोढा, राजू येल्टीवार, राजू कासावार, डॉ. मोरेश्वर पावडे, विवेक मांडवकर, ओम ठाकूर, अशोक पांडे, जय आबड, डॅनी सँड्रावार, टिकाराम कोंगरे, शामा तोटावार, वंदना आवारी, शालिनी रासेकर, अलका महाकुलकर, विजया आगबत्तलवार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.