हास्याचे कारंजे, प्रेक्षकांचा टाळ्या… वणीत रंगला ‘जय बोला प्रिय पत्नीची’चा प्रयोग

लखबीर सिंह लक्खा यांचे वणीत आगमन.. आज शासकीय मैदानावर रंगणार मैफल

बहुगुणी डेस्क, वणी: प्रेक्षकांच्या उत्स्फुर्त प्रतिसादात वणीतील श्री विनायक मंगल कार्यालयात ‘जय बोला प्रिय पत्नीची’ या नाटकाचा प्रयोग रंगला. कधी काळी वणीत वर्षाला किमान 8-10 नाटकाचे प्रयोग व्हायचे. मात्र या समृद्ध अशा नाट्य चळवळचा -हास होत गेला. आता वणीत वर्षाला एखाद्या नाटकाचा प्रयोग प्रेक्षकांसाठी होतो. वणीतील नाट्य चळवळीला पुनरुज्जीवन मिळावे या हेतूने विजय चोरडिया यांच्या पुढाकारातून यावर्षी संगीतमय कार्यक्रमासह अधिकाधिक नाट्य प्रयोग ठेवण्यात आले आहे. आज संध्याकाळी ठिक 6.30 मिनिटांनी वणीतील पाण्याच्या टाकीजवळील शासकीय मैदानात संपूर्ण देशातच नाही तर जगभरात आपल्या जगरात्यासाठी प्रसिद्ध असलेले ‘किजो केसरी के लाल’, ‘बेटा बुलाये’ फेम गायक लखबीर सिंह लक्खा यांची भजन संध्या होणार आहे. या संगीतमय मैफिलीला मोठ्या संख्येने हजर राहावे, असे आवाहन जन्माष्टमी महोत्सवाचे अध्यक्ष ऍड कुणाल विजय चोरडिया यांनी केले आहे.

लखबीर सिंह लक्खा यांचे वणीत आगमन
लखबीर सिंह लक्खा यांची भक्तीमय मैफल हे जन्माष्टमी महोत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने मंगळवारीच नागपूर येथे लखबीर सिंह लक्खा व त्यांची चमू यांचे आगमन झाले. त्यानंतर त्यांची टीम वणीसाठी रवाना झाली. वणीत आल्यावर त्यांचे विजय चोरडिया यांच्या निवासस्थानी भव्य स्वागत करण्यात आले. बुधवारी रात्री त्यांनी विजय चोरडिया यांच्या फार्म हाऊसवर मुक्काम केला. पहिल्यांदाच लखबीर सिंह वणीत येत असल्याने रसिक उत्साहित आहे. प्रेक्षकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन आयोजकांतर्फे या मैफलीसाठीची सर्व तयारी करण्यात आली आहे. महिलांच्या बैठकीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

सुरुवातीला संध्या 6.30 वा. गुणवंत विद्यार्थी व शासकीय नोकर भरतीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे. वेळेचे बंधन असल्याने सं. ठिक 7 वाजता लखबीर सिंह यांच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जन्माष्टमी महोत्सव समिती परिश्रम घेत आहे.

Comments are closed.