लाडक्या भाच्यांना कधी मिळणार मोफत गणवेश, संभाजी ब्रिगेडचा सवाल

भाच्यांनी स्वातंत्र दिन साजरा केला जुन्या कपड्यात

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शाळा सुरु होऊ दोन महिने उलटले तरी विद्यार्थ्यांना अद्यापही मोफत गणवेश मिळालेला नाही. नुकताच देशाचा स्वातंत्र्यदिन पार पडला. मात्र हा सोहळाही विद्यार्थ्यांना गणवेशाविनाच साजरा करावा लागला. एकीकडे सरकारचे लाडक्या बहिणीकडे लक्ष आहे. मात्र त्यांचे मुलं असलेल्या भाच्याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडतर्फे करण्यात आला. विद्यार्थ्यांना मोफत गणवेश कधी मिळणार, असा सवाल करीत संभाजी ब्रिगेडने याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर केले.

विद्यार्थ्यांना दोन गणवेश मोफत देणार, याची मोठी जाहिरात सरकारने केली. मात्र विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेश मिळालेले नाही. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात हीच स्थिती आहे. काही ठिकाणी गणवेश वाटप झाले. मात्र ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. अनेक गणवेशाची मापे चुकलेली आहेत. सरकारी शाळांतून केवळ गोरगरीबांचे मुलं शिक्षण घेतात. 15 ऑगस्टला त्यांना नवीन कपडे घालण्याची संधी असते. मात्र ही संधी देखील सरकारने हिरावून घेतली, असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

सरकार फक्त लाडक्या बहिणीकडे लक्ष देत असून भाच्यांकडे त्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊन त्यांना त्वरित दर्जेदार गणवेश उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी अजय धोबे यांच्यासह मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अंबादास वागदरकर, एड अमोल टोंगे, भाउसाहेब आसुटकार, दत्ता डोहे, दिनेश बलकी इत्यादींची उपस्थिती होती.

खुशखबर – वरोरा फाट्यावरून बसने वणीला येणे झाले सोयीस्कर

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.