महिलांविरोधात विविध गुन्हे, तर धाबाचालकावर विनयभंगाचा गुन्हा

मंदर अवैध दारू विक्री कांड: परस्पर विरोधात गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: कायदा हातात घेऊन परिसरातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात खळबळ उडवून देणा-या मंदर येथील धाबा जळीत कांड प्रकरणी महिलांसह 8 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर धाबाचालक व त्याच्या भावावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अवैध दारूविक्रेत्यावर कार्यवाही करण्याऐवजी पोलिसांनी लाडक्या बहिणीवरच गंभीर गुन्हे दाखल केले आहे. हा चोर सोडून संन्याशाला शिक्षा देण्याचा प्रकार आहे, असा आरोप युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी केला आहे.

धाबा चालकाच्या तक्रारीनुसार, दिलीप सुरजप्रकाश ओझा (32) रा. कोंडावार ले आऊट येथे राहतात. त्यांचे 5 वर्षांपासून मंदर येथील रोपवाटीकेजवळ बाबूभैय्या का ढाबा नावाने धाबा आहे. 20 ऑगस्ट रोजी स 9 वाजता दोन ऑटो भरून गावातील 40 ते 45 महिला व 20 ते 25 पुरुष असे ढाब्यासमोर आले. यावेळी दिलीप पलंगावर आराम करीत होता. त्यानंतर त्या महिला व पुरुषांनी मिळून गल्ल्यातील 8 हजार रुपये काढून घेतले व दिलीप याला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली.

दिलीप याच्या खिशातील 1000 हजार रुपये काढून घेतले. तसेच खिशातील मोबाईल काढून जाळून टाकला व ढाब्याला आग लावली. शिवाय दिलीप याला जाळण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी दिलीप चा भाऊ चंदन यांना तेघे आला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. त्याच्या पॉकेटमधील आधार कार्ड, पॅनकार्ड, इलेक्शन कार्ड, एटीएम इत्यादी व 900 रुपये नगदी काढून काहींनी त्याला देखील मारहाण केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ढाबा जाळल्याने 3 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दिलीप यांच्या तक्रारीवरून 8 जणांवर बीएनएसच्या 189 (2), 191 (1), 191 (2), 191 (3), 119 (1), 326 (f), 115 (2), 324 (4), 324 (5), 351 (2), 351 (3), 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेच्या तक्रारीनुसार, दिलीप ओझा व त्याचा भाऊ चंदन ओझा हे त्यांच्या ढाब्यावर दारू विक्री करतात. 20 ऑगस्ट रोजी सकाळी काही महिला व पुरुष धाब्यावर दारू शोधण्यासाठी गेले होते. महिलांनी दिलीप याला ढाब्याचे दार उघण्यास सांगितले. परंतु त्याने दार उघडले नाही. तेव्हा महिलांनी ढाब्याचे दार तोडून आत प्रवेश केला. महिलांनी दारू कुठे लपवून ठेवली, अशी विचारणा केली असता माझे वडील पोलीस आहे. तुम्हाला काय करायचे आहे, अशी अरेरावी धाबाचालकाने केली.

दरम्यान फ्रिजजवळ दारूचा शोध घेत असताना दिलीप याने दोन महिलांचा हात पकडून व पदर ओढून विनयभंग केला. तर चंदन ओझा याने जातीवाचक शिवी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे. धाबाचालकाने महिलांच्या अंगावर हात टाकल्याची माहिती काही महिलांनी बाहेर असलेल्या पुरुषांना दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या पुरुषांनी धाबा चालकाला मारहाण केली, असेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी वणी पोलिसात दिलीप ओझा त्याचा भाऊ चंदन ओझा याच्याविरोधात बीएनएसच्या 74 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाडक्या बहिणीवर गंभीर गुन्हे, युवासेनेचा आरोप
मंदर जवळील वन विभागाच्या नर्सरी समोरील धाब्यावर गेल्या अनेक दिवसांपासून अवैध रित्या दारू विक्री सुरु होती. पोलीस प्रशासनाला याबाबत माहिती दिल्यावरही पोलिसांनी कार्यवाही केली नाही. गावातील तरुण पोरं व्यसनाच्या नादी लागत होते व दारूमुळे गावात भांडण तंटे वाढत होते. त्यामुळे महिलांनी आक्रमक भूमिका घेतली. या प्रकरणी राजकीय दबावामुळे लाडक्या बहिणीवरच गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले, असा आरोप अजिंक्य शेंडे यांनी केला आहे. हा प्रकार म्हणजे चोर सोडून सन्याशाला शिक्षा देण्याचा आहे. या प्रकरणात राजकारण होत असून राजकीय दबावापोटी पोलिसांनी सदर कार्यवाही केल्याचा आरोपही त्यांनी केला.

खुशखबर – वरोरा फाट्यावरून बसने वणीला येणे झाले सोयीस्कर

लखबीर सिंह यांच्या भजनाने वणीकर मंत्रमुग्ध, छत्री घेऊन कार्यक्रमाचा आस्वाद

Comments are closed.