पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी येथील एसबी हॉलमध्ये आदिवासी एकता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. आदिवासी दिनाचे औचित्य साधून बिरसा ब्रिगेड तर्फे हा सोहळा घेण्यात आला. यानिमित्त विविध वैचारिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्क्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध विधिज्ज्ञ ऍड सुलतान अली यांची उपस्थिती होती. सुरेश काकडे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गजानन मेश्राम होते. प्रमुख पाहुणे म्हणून पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.
स्वागताध्यक्ष सुधाकर चांदेकर यांचा सुरेश काकडे यांनी सत्कार केला. झरी तालुक्यासाठी जमीन दान देणाऱ्या दानशुराच्या नावाने त्या स्थळी स्मारक व गेट निर्माण करण्याचे खाडे यांनी आश्वासन दिले. योगेश रायपुरे यांनी समाजाला एकजूट होऊन आपल्या समस्या मार्गी लावाव्यात व शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. माधुरी अंजीकर यांनी राजकिय, सामाजिक व शैक्षणिक व विविध वर्तमानातील वास्तविकतेवर भाष्य केले. तर ऍड सुलतान अली यांनी उपस्थितांना आदिवासींचे विविध हक्क यावर कायदेविषयक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला यासह उत्तम गेडाम, प्रीतम राजगडकर, श्रीकृष्ण मडावी, विजय गेडाम, अर्चना किनाके, माधुरी अंजीकर, दिलीप शेडमाके, विठ्ठल उईके, चेतन कुळमेथे, नामदेव कोडापे, नीलेश पंधरे, सूरज आत्राम, शेषराज मडावी, योगेश रायपुरे, मारोती कुसराम, तुळशीराम पेंदोर, मोरेश्वर गेडाम, मंगेश उईके, विशाल वाघ, जयसिंग कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. कलावंतांनी आदिवासी नृत्य, ढेमसा, गोंडी नृत्य कला सादर केली. कार्यक्रमाचे संचालन विनोद आदे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शेषराज मडावी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संजय मडावी, विनोद आत्राम, डॉ. चांदेकर, दिनेश आतराम, स्वप्निल आत्राम, कवडू उईके, प्रवीण आत्राम, गोविंदा आत्राम, चंदू मळावी, हंसराज भादीकर, संतोष कुरसंगे, रंजना तोडसाम, चंदा किनाके यांच्यासह बिरसा ब्रिगेडच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
Comments are closed.