विवाहित तरुणाचा कॉलेज कुमारिकेवर अत्याचार, मुलगी गर्भवती

आधी वाढवली कुटुंबीयांशी सलगी, नंतर मुलीला ओढले जाळ्यात...

बहुगुणी डेस्क, वणी: त्या नराधमाचे लग्न झाले होते. घरी बायको होती. मात्र त्याची वासनांध नजर एका कॉलेज कुमारिकेवर गेली. त्याने तिच्याशी जवळीक साधण्यासाठी आधी तिच्या कुटुंबीयांशी सलगी वाढवली. नंतर मुलीला मदत करणे सुरु केले. तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तिच्यावर वारंवार अत्याचार केला. अखेर ती गर्भवती राहिली. वणी तालुक्यात ही घटना घडली. या प्रकरणी आरोपीविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Podar School 2025

तक्रारीनुसार, पीडित मुलगी ही 17 वर्षांची असून ती तालुक्यातील एका गावात राहते. ती महाविद्यालयात शिक्षण घेते. आरोपी (33) हा पीडित मुलीला लहानपणापासून पाहत होता, तिला तो ओळखत होता. ती वयात आली. त्या नराधमाची नजर पीडितेवर पडली. त्याने तिच्यावर जाळं टाकण्यास सुरुवात केली. मात्र मुलगी त्याला विशेष दाद देत नव्हती. त्यामुळे मुलीशी ओळख वाढवण्यासाठी त्याने तिच्या कुटुंबीयांशी संबंध वाढवण्यास सुरुवात केली. यात तो यशस्वी झाला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तो मुलीला विविध कामांसाठी मदत करीत होता. तो तिला कधी कॉलेजला सोडून द्यायचा. इकडे तिच्या घरचे कामही तो नित्याने करायचा. त्याने तिला विविध प्रलोभने दाखवत प्रेमाच्या जाळ्यात अडकवलेच. एके दिवशी त्यांने तिला निर्जन ठिकाणी नेले. तिथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तो तिला विविध निर्जन ठिकाणी व जंगलात घेऊन जायचा व तिच्यावर अत्याचार करायचा. सतत पाच महिन्यांपासून हा अत्याचार सुरु होता. त्यातच ती 5 आठवड्याची गर्भवती असल्याचे तिला कळले. 

तिने सर्व घटना आपल्या वडिलांना सांगितली. हे ऐकताच त्यांना हादरा बसला. आरोपी हा विवाहित असल्याने पीडितेचे तिच्यासोबत लग्न लावून देण्याचा पर्यायही त्यांच्यासमोर नव्हता. अखेर तिच्या पालकांनी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीवर बीएनएसच्या कलम 64, 64 (2) (I) (M), 351 (2)(3) यासह पोक्सो व ऍट्रोसिटीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Comments are closed.