कृष्णाणपूर येथील बैलजोडी चोरट्याला अटक

शिरपूर पोलिसांची कारवाई, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी ताब्यात

विलास ताजणे, वणी: शिरपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कृष्णाणपूर येथील एका शेतकऱ्याची अंदाजे सव्वा लाख रूपये किमतीची बैलजोडी शेतातून चोरी गेल्याची घटना दि. 14 शनिवारी रात्री दरम्यान घडली होती. तक्रार दाखल होताच शिरपूर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले.

वणी तालुक्यातील कृष्णाणपूर येथिल शेतकरी नामदेव दादाजी लांडे हे मोहदा रस्त्यालगत असलेल्या शेतात नेहमीप्रमाणे बैलजोडी बांधून शनिवारी रात्री घरी परतले. रविवारी सकाळी शेतात येताच बैलजोडी दिसली नाही. कुणीतरी बैलजोडी चोरून नेल्याची शंका आली. त्यांनी बैलजोडी चोरी गेल्याची तक्रार शिरपूर पोलिसांत दाखल केली. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश केंद्रे, ठाणेदार माधव शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनेची चौकशी सुरू केली.

कुरई लगतच्या डोर्ली येथील संशयित भोलाराम सुरेश पडोळे (वय 33) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. भोलारामसह पुन्हा दोघे यात सहभागी असल्याचे कळते. पोलिसांनी भंडारा जिल्ह्यातील गावातून बैलजोडी आणि जोडी वाहून नेणारे पिकअप वाहन असा एकूण चार लाख 20 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. ठाणेदार माधव शिंदे, पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बुधवंत, पोलीस शिपाई गंगाधर घोडाम, गजानन सावसाकडे, चालक विजय फुल्लूके आदींनी कारवाई केली.

अवघ्या चोवीस तासांच्या आत पोलिसांनी घटनेचा तपास करून आरोपींसह बैलजोडी ताब्यात घेतली. परिणामी शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू आले. त्याबद्दल शिरपूर पोलिसांचे कौतुक होत आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.