रक्तदान शिबिर घेऊन केली प्रेषित मोहमद पैगंबर यांची जयंती साजरी

195 रक्तदात्यांनी केले रक्तदान, मोमिनपुरा येथे निघाली भव्य शोभायात्रा

विवेक तोटेवार, वणी: सोमवार 16 सप्टेंबर रोजी इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहमद पैगंबर यांची जयंती विविध कार्यक्रम घेऊन मोठया आनंदाने साजरी करण्यात आली. या निमित्त वणीच्या छ. शिवाजी महाराज चौकात जमात ए इस्लामी हिंद वणी शाखेद्वारे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिरात 195 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाज जागृतीचा परिचय दिला. सोबतच संध्याकाळी विविध संघटनांद्वारे रॅली काढण्यात आली.

सोमवार 16 सप्टेंबर रोजी वणीच्या शिवाजी महाराज चौकात जमत ए इस्लामी हिंद या संघटनेद्वारे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराची सुरवात सकाळी 9 वाजता झाली तर सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत रक्तदान करण्यात आले. या शिबिरासाठी रक्त घेण्याकरिता नागपूर येथील लाईफ लाईन ब्लड बँक यांना बोलाविण्यात आले होते. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष मो. आरिफ खान, तर उदघाटन म्हणून वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून वणीचे ठाणेदार अनिल बेहराणी व वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सीता वाघमारे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सैय्यद अतिक यांनी केले. तर संचालन आरिफ कच्ची यांनी केले व उपस्थितांचे आभार जिया अहेमद यांनी मानले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या कार्यक्रमात पोलीस खात्यातील शेखर वांढरे वारली चित्रकार, राजू बागेश्वर वाहतूक कर्मचारी, प्रगती झुमनाके यांचा सत्कार करण्यात आला. या शिबिराला राजू उंबरकर (मनसे), राजा पाथ्रडकर काँग्रेस, डॉ महेंद्र लोढा (काँग्रेस), ओम ठाकूर (काँगेस), आबीद हुसैन (रा.काँ), रज्जाक पठाण यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

मोमिनपुरा येथे शोभायात्रा
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त वणीच्या मोमीनपुरा येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा वणीच्या मुख्य चौकातून वाजता गाजत निघाली. या शोभायात्रेसाठी वणीच्या विविध चौकात वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले होते. शहराचे मार्गक्रमण केल्यानंतर मोमिनपुरा येथे रॅलीची सांगता झाली. मुस्लिम बांधव या आनंदमय प्रसंगी आपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन शोभायात्रेत सहभागी झाले होते.

जनतेप्रति कर्तव्य जागृत करणारे कार्यक्रम : गणेश किंद्रे 
या कार्यक्रमात वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे हे उदघाटन म्हणून उपस्थित होते. समाजाप्रती व्यक्तीचे काही कर्तव्य असतात हे कर्तव्य एक व्यक्ती म्हणून पूर्ण करणे गरजेचे आहे. असे कार्यक्रम घेणे म्हणजे समाजाला आपल्या कर्तव्याची जाणीव देणे होय, असे मत त्यांनी मांडले.

Comments are closed.