विवेक तोटेवार, वणी: नातेवाईकाची दुचाकी घेऊन घरी जात असलेल्या एका तरुणाचा दुचाकी नाल्यात कोसळून मृत्यू झाला. मंगळवारी दिनांक 17 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. उमेश मारोती सातपुते (35) रा. शेलु (खु.) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवारी दिनांक 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी उमेश हा गावातील गणेशोत्सवात सहभागी होता. त्यानंतर रात्री 10 वाजताच्या सुमारास तो त्याचा मित्र गणेश शंकर चिकटे याची दुचाकी (MH 29 AF 6628) घेऊन नांदेपेरा येथे निघाला. मात्र गावालगत असलेल्या नाल्यात त्याची दुचाकी कोसळली. पहाटेच्या सुमारास गावातील लोकांना पुलाखाली एक दुचाकी व दुचाकीस्वार पडून दिसला. काहींनी दुचाकी गणेशची असल्याचे ओळखले. तर दुचाकीजवळ पडून असलेला युवक हा उमेश असल्याची ओळख पटली. गावातील लोक घटनास्थळी गोळा झाले. याबाबत वणी पोलिसांना माहिती देण्यात आली. उमेश याला वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डोक्याला गंभीर मार उमेश याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दुचाकी चालवताना तोल गेल्याने दुचाकी कोसळली व त्यातच उमेशचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. मात्र हा अपघात आहे की घातपात हे उत्तरिय तपासणीचा रिपोर्ट आल्यानंतर कळेल. उमेश याच्या पश्चात आई वडील, पत्नी, दोन मुली असा आप्त परिवार आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.