बहुगुणी डेस्क, वणी: वणीत बाहेरगावाहून ट्यूशनसाठी आलेला विद्यार्थी घरी परतलाच नाही. त्याला कुणीतरी पळवून नेल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांना आहे. याबाबत वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल कऱण्यात आली आहे. अनिरुद्ध अमोल गवळी (17) हा राजूर इजारा येथील रहिवासी असून तो वणीतील एका महाविद्यालयात 12 व्या वर्गात शिकतो. त्याचे वडील ऑटो चालक आहेत. अनिरुद्ध रोज विठ्ठलवाडी परिसरात एका खासगी ट्युशनसाठी येतो. सोमवारी दिनांक 16 सप्टेंबरला अनिरुद्ध नेहमी प्रमाणे सकाळी ट्युशनसाठी आला होता. मात्र ट्युशन संपल्यावर तो नेहमीप्रमाणे घरी पोहोचला नाही. संध्याकाळी त्यांच्या कुटुंबीयांना त्याच्या मित्रांना कॉल लावला. नातेवाईकांकडे विचारणा केली मात्र त्याचा काही शोध लागला नाही. अखेर त्याच्या वडिलांनी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. त्यांना त्यांच्या मुलाला कुणीतरी पळवून नेल्याचा संशय आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध बीएनएसच्या कलम 137 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून अनिरुद्धचा शोध घेतला जात आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Prev Post
Comments are closed.