शेतीच्या रस्त्याचा वाद विकोपाला, धारदार शास्त्राने वार

शेतकरी जखमी, दोघांविरोधात गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: शेतात ये-जा करण्याचा रस्त्याचा वाद विकोपाला जाऊन बापलेकाने एकावर धारदार शास्त्राने वार केला. यात एक जण जखमी झाला आहे. तालुक्यातील उमरी येथे 15 सप्टेंबर रोजी ही घटना घडली. जखमीच्या तक्रारीनुसार वणी ठाण्यात दोघांवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Podar School 2025

तक्रारीनुसार, गणेश महादेव मोरे (40) रा. उमरी यांचे उमरी शिवारात शेत आहे. त्यांच्या शेतात जाण्याचा मार्ग हा चंद्रभान विठ्ठल खिरटकर (35) रा. उमरी यांच्या शेतातून जातो. या कारणावरून चंद्रभान व गणेश यांच्यात वाद आहे. 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास गणेश हा शेतातून घऱी परतत होता. त्या वेळी चंद्रभान याने गणेशचा रस्ता अडविला व या रस्त्याने तू ये जा करू नको म्हणून वाद घातला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

गणेश याने हा रस्ता माझ्यासाठी सुद्धा आहे म्हटले असता चंद्रभान याने हातातील एका धारदार शस्त्राने गणेश यांच्यावर वार केला. या घटनेत गणेश यांच्या उजव्या डोळ्याच्या वर जखम झाली. सोबतच आणखी एकाने गणेशला खुरप्याने डाव्या हातावर वार करून जखमी केले. यानंतर गणेश याला त्याच्या मुलाने उपचारासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

गणेश यांनी उपचार करून वणी पोलिसात याबाबत तक्रार दिली. गणेश याच्या तक्रारीवरून चंद्रभान खिरटकर व आणखी एकाविरोधात वणी पोलिसात कलम 118 (1), 351 (2), 351 (3), 352 भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Comments are closed.