माथार्जून येथील नेत्ररोग चिकित्सा शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद

शेकडो रुग्णांनी घेतला लाभ, विजय चोरडिया यांचा उपक्रम

विवेक तोटेवार, वणी: झरी तालुक्यातील माथार्जुन येथे भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांच्यावतीने निशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया, दिनकर पावडे, राजू धावंजेवार, श्रीराम भोयर, वैशाली भोयर, संभाजी नगराळे, अशोक सिंग, देविदास चुक्कलवार उपस्थित होते. विजय चोरडिया हे संपूर्ण जबाबदारीने आरोग्य शिबिर असो की कुठलाही उपक्रम, ते पुरेपूर यशस्वीरीत्या पार पडण्याचे कार्य करत आहे. त्यामुळे येथे मोफत आरोग्य शिबिरात आपण मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाभ घेत आहोत, असे मत दिनकर पावडे यांनी व्यक्त केले. तसेच गुरुदेव उपासक संभाजी नगराळे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. गंगामाता मंदिर येथे आयोजित मोफत नेत्र चिकित्सा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी करून परिसरातील हजारो नागरिकांनी यावेळी लाभ घेतला. या कार्यक्रमाचे संचालन सागर मुने यांनी केले, तर आभार राहुल मुंजेकर यांनी मानले. 

Podar School 2025

Comments are closed.