बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील मुर्धोनी येथे अवैधरित्या दारू बागळून विक्री करणा-या एका दाम्पत्याला वणी पोलिसांनी अटक केली. मंगळवारी दिनांक 8 ऑक्टोबर रोजी दु. 4 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या धाडीत पोलिसांनी दुचाकीसह देशी दारुचे 99 पव्वे जप्त केले. दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वणी पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना दु. 3.30 वाजताच्या सुमारास खबरीद्वारे मुर्धोनी ता. वणी येथे अवैधरित्या दारू बाळगून असल्याची माहिती मिळाली. माहितीवरून पथक मुर्धोनी येथे गेले असता. पथक गावातील काही महिलांना सोबत घेऊन आदे यांच्या घराजवळ गेले असता तिथे भैय्या माधव आदे (62) व विजया भैय्या आदे (60) दोघेही रा. मुर्धोनी हे एका मोपेड जवळ आढळून आले. पोलीस आल्याचे दिसताच भैय्या हा पळून गेला.
पोलिसांनी मोपेडची झडती घेतली असता वाहनातील एका कापडी पिशवीत देशी दारूचे 90 मीलीचे 99 नग आढळले. ज्याची किंमत 3440 रुपये आहे. पोलिसांनी दारू बाळगण्याच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्यांना परवाना आढळून आला नाही. पोलिसांनी दारूचे पव्वे व मोपेड असा सुमारे 44,000 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी भैय्या माधव आदे (62) व विजया भैय्या आदे (60) दोघेही रा. मुर्धोनी या दोघांविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलम 65(e) नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.
Comments are closed.