मटका व्यावसायिकाशी संबंध भोवले, 2 पोलीस कर्मचारी निलंबित

सोशल मीडियात व्हायरल झाली होती चाटिंग

बहुगुणी डेस्क, वणी: मटका व्यावसायिकाशी संबंध ठेवणे वणी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचा-यांना चांगलेच भोवले. या दोन्ही मटका बहाद्दर पोलिसांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले. गेल्या चार दिवसांआधी या दोन पोलीस कर्मचा-यांची मटका व्यावसायिकासोबत केलेली चाटींग तसेच विविध आरोप केलेला एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. सदर प्रकाराने पोलिसांची प्रतिमा मलीन झाली होती. अखेर पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांच्या आदेशाने एसडीपीओ गणेश किंद्रे यांनी या दोन्ही पोलिसांना निलंबीत केले. पंकज उंबरकर व विशाल गेडाम असे निलंबीत कर्मचा-यांचे नाव आहे. यातील एका कर्मचा-यावर याआधीही निलंबणाची कारवाई करण्यात आली होती.

Podar School 2025

Comments are closed.