शिक्षणासह उपक्रमातही शाळा क्र. 7 अग्रेसर – आ. संजीवरेड्डी बोदकुरवार

शाळेत पार पडली बालसभा, शिष्यवृत्ती यादीत झळकलेल्या वैष्णवीचा सत्कार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरामधील सेमी इंग्लिश माध्यमांमधून शिक्षण देणारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर परिषद शाळा क्रमांक 7 ही शैक्षणिक बाबी सोबत इतर उपक्रम राबविणारी ही सर्वोत्तम शाळा आहे. असे गौरवोद्गार आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार केले. ते शाळेत आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांच्या बालसभेत शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करतांना बोलत होते. बालसभेच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक गजानन कासावार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा योगिता निंबाळकर, मनीषा गायकवाड, जयेश चोरडिया हे होते.

सर्वप्रथम बालसभेला सुरुवात होवून इयत्ता सहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमावर आधारित कविता, गोष्टी, नाटिका, थोर पुरुषांची माहिती दिली. त्यानंतर आमदार बोदकुरवार यांनी यावर्षी इयत्ता पाचव्या वर्गातून शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या वैष्णवी सुदामा बघेल हिचा व तिच्या आईचा तसेच वर्ग शिक्षक दिगांबर ठाकरे यांना भेटवस्तू शाल श्रीफळ व प्रमाणपत्र देवून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यानंतर आमदारांनी शाळेला 2 कोटी 15 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

पुढे बोलताना आमदार बोदकुरवार म्हणाले की, नगर परिषद शाळा क्रमांक 7 मधील विद्यार्थी दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत मेरिट मध्ये येतात. या शाळेत उत्कृष्ठ शिक्षणासोबत विविध सहशालेय उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा विकास घडवून आणल्या जातो ही आनंदाची बाब आहे. त्यामुळेच या शाळेला अत्याधुनिक करण्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे.

अध्यक्षीय मनोगतातून कासावार यांनी या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आम्ही कटिबध्द आहोत. असा विश्वास दिला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व प्रास्ताविक पदवीधर शिक्षक चंदू परेकर यांनी केले. आभार प्रदर्शन विजय चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभांगी वैद्य, मंगला पेंदोर, सोनू लोडे यांनी परिश्रम घेतले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.