आज वणीत घुमणार सर्वसामान्यांचा आवाज, तहसीलसमोर धरणे आंदोलन

स. 11 वा. काँग्रेसतर्फे संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात आंदोलन

बहुगुणी डेस्क, वणी: वणीत शेतकरी व वणी विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यांबाबत भव्य धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दि. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन केले जात आहे. वणी विधानसभा काँग्रेस कमिटीद्वारा हे आंदोलन करण्यात येत असून काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात वणी विधानसभेतील शेतकरी, कष्टकरी, महीला, युवा यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संजय खाडे यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

निराधार लाभार्थ्यांचे रखडलेले पैसे त्वरित जमा करावेत. कापसासाठी ₹10000 व सोयाबीनसाठी ₹9000 भाव द्यावा. घरकुल योजनेचे प्रलंबित हफ्ते तत्काळ जमा करण्यात यावेत. वन्यप्राण्यांमुळे पिकांच्या नुकसानीचे दावे त्वरित मंजूर करावेत. जंगली जनावरांच्या समस्येचां कायमस्वरुपी बंदोबस्त करण्यात यावा, जंगल आणि शेतकऱ्यांच्या शेतांभोवती पक्के कंपाऊंड बांधले जावे, जंगली जनावरांमुळे होणारे नुकसान पिक विमा योजनेत समाविष्ट करावे.

शेतकऱ्यांना दिवसा 12 तास नियमित वीज पुरवठा करावा. पीक विम्याचे प्रलंबित दावे त्वरित मार्गी लावावेत. शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्जमाफी करावी. PM किसान सन्मान निधी योजने मध्ये 2019 नंतर सातबारावर फेरफार झालेल्या शेतकऱ्यांना अपात्र करण्याची अट रद्द करावी. वणी शहरात स्वच्छ पाण्याचा पुरवठा, गटारींची नियमित साफसफाई, आणि रोगराई नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाव्यात. अशा प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

लोकांच्या प्रश्नांसाठी आंदोलन – संजय खाडे
वणी विधानसभेतील शेतकरी, कष्टकरी, महीला, युवा यांच्या मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. या प्रश्नांवर वारंवार निवेदन देण्यात आले. मात्र लोकप्रतिनिधी, प्रशासनाने याकडे कायम दुर्लक्ष केले. त्यामुळे हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलन सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांवर असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी या मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,

Comments are closed.