आचारसंहितेआधी घुमला काँग्रेसचा आवाज, तहसीलवर धडक

सर्वसामान्यांच्या समस्यांसाठी पुन्हा एकदा धावून आले संजय खाडे

बहुगुणी डेस्क, वणी: आचारसंहितेआधी वणीत संजय खाडे यांचा आवाज घुमला. सर्वसामान्यांच्या समस्यांसाठी पुन्हा एकदा ते धावून आले. वणी विधानसभा क्षेत्रातील समस्या, शहरातील विविध प्रश्न , शेतक-यांचे विविध प्रश्न इत्यादींवर वणीत मंगळवारी दिनांक 15 ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे एकदिवशीय धरणे आंदोलन झाले. काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते, समर्थक व समर्थक उपस्थित होते. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत प्रशासनाचा निषेध केला.

Podar School 2025

दुपारी 12 वाजता तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलन मंडपी काँग्रेसच्या विविध स्थानिक नेत्यांनी भेट देत आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर शेकडो आंदोलकांनी संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात तहसील कार्यालयावर धडक दिली. आंदोलकांच्या प्रतिनिधींनी उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देत चर्चा केली. त्यानंतर कार्यालयासमोर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

निराधार लाभार्थ्यांचे रखडलेले पैसे त्वरित जमा करावेत. कापसासाठी ₹10000 व सोयाबीनसाठी ₹9000 भाव द्यावा. घरकुल योजनेचे प्रलंबित हफ्ते तत्काळ जमा करण्यात यावेत. वन्यप्राण्यांमुळे पिकांच्या नुकसानीचे दावे त्वरित मंजूर करावेत. जंगली जनावरांच्या समस्येचां कायमस्वरुपी बंदोबस्त करण्यात यावा, जंगल आणि शेतकऱ्यांच्या शेतांभोवती पक्के कंपाऊंड बांधले जावे, जंगली जनावरांमुळे होणारे नुकसान पिक विमा योजनेत समाविष्ट करावे. शेतकऱ्यांना दिवसा 12 तास नियमित वीज पुरवठा करावा. पीक विम्याचे प्रलंबित दावे त्वरित मार्गी लावावेत. शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्जमाफी करावी. PM किसान सन्मान निधी योजने मध्ये 2019 नंतर सातबारावर फेरफार झालेल्या शेतकऱ्यांना अपात्र करण्याची अट रद्द करावी. वणी शहरात स्वच्छ पाण्याचा पुरवठा, गटारींची नियमित साफसफाई, आणि रोगराई नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाव्यात. इ. मागणीचे निवेदन देण्यात आले.

मतदानातूनच सत्ताधा-यांना उत्तर द्या – संजय खाडे
वणी विधानसभेतील शेतकरी, कष्टकरी, महीला, युवा यांच्या समस्यांवर वारंवार निवेदन देण्यात आले. मात्र निगरगट्ट प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे कायम दुर्लक्ष केले. लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आता जनतेनी मतदानातूनच चोख उत्तर द्यावे.
– संजय खाडे, जिल्हा सरचिटणीस काँग्रेस

आंदोलनात मोरेश्वर पावडे, प्रमोद वासेकर, जयसिंग गोहकर, पुरुषोत्तम आवारी, तेजराज बोढे, विवेक मांडवकर, सुनील वरारकर, राजाभाऊ पात्रडकर, प्रमोद निखुरे, अशोक पांडे, अशोक चिकटे, पवन एकरे, साधना गोहोकर, अल्का महाकुलकर, संगीता खाडे, अनिल भोयर, उत्तम गेडाम, वंदना दगडी, अजय धोबे, काजल शेख, अनंता डंभारे, संदीप ढेंगळे, रुद्रा कुचणकर, प्रशांत गोहोकार, अरविंद वसनोर, प्रफुल थेरे, सागर बोबडे, अमोल झाडे, प्रमोद लोणारे, गजानन शळके, रोहन आसुटकर, नरेंद्र लोणगाडगे, सचिन आसुटकर, प्रदीप खेकारे, अशोक नागभिडकर, कविता चटकी, रवी कोटावर, प्रफुल उपरे, रघुवेंद्र कुचनकर, सुरेश रायपुरे, सुरेश बनसोडे, कैलास पचारे, अरुण नागपुरे, नारायण गोडे, राजू मालेकर, समाधान कुंघटकर, संजय सपाट, मनोज खाडे, बंडू खिरटकर, मुरलीधर ठाकरे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, लाभार्थी व नागरिक शेकडो संख्येमध्ये उपस्थित होते.

Comments are closed.