म. ज्योतिबा फुले चौकाच्या सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन

स्मारक वणीकरांना प्रेरणादाई ठरेल - आ. संजीवरेड्डी बोदकुरवार

बहुगुणी डेस्क, वणी: महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौक सौंदर्यीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा मंगळवारी पार पडला. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. महात्मा फुले चौकासाठी 7 लाख 58 हजार तर सावित्रीबाई फुले चौकासाठी 5 लाख रुपये आमदार निधीतून मंजूर करण्यात आला. यावेळी माळी समाज संघटनेतर्फे आ. बोदकुरवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या तैलचित्राचा फलक प्रभाग क्रमांक 7 (वार्ड क्रमांक 21) मध्ये लावला आहे. हा परिसर महात्मा फुले चौक म्हणून ओळखला जातो. मात्र या चौकात घाणीचे साम्राज्य होते. स्थानिक नागरिकांनी व माळी समाज संघटनेने याबाबत वारंवार तक्रार करून चौकाच्या सौंदर्यीकरणाची मागणी केली होती. अखेर आचारसंहिता लागण्याच्या एक दिवस आधी या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

स्मारक वणीकरांना प्रेरणादाई ठऱेल – आ. संजीवरेड्डी बोदकुरवार
फुले दाम्पत्य आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक होते. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची त्यांनी मुहूर्तमेढ रोवली, ते कायम बहुजनांच्या न्याय आणि हक्कासाठी लढले. यांनी शिक्षण, आरोग्य अशा विविध सामाजिक सुधारणा केल्या. महापुरुष हे फक्त एका समाजाचे नसून त्यांचे कार्य सर्व समाजांसाठी प्रेरणादायी असते. हे स्मारक पण वणीकरांसाठी कायम प्रेरणा देत राहिल.
– संजीवरेद्दी बोदकुरवार, आमदार वणी विधानसभा

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, भाजपा जि.सचिव संध्या अवताडे, माळी समाज संघटन अध्यक्ष प्रवीण निकोडे, उपाध्यक्ष दशरथ निकोडे, चंदन मोहुर्ले, सचिव अमोल बोरूले, कार्याधक्ष अक्षय निकोडे, कोषाध्यक्ष नितीन मांदाडे, सहसचिव पवन गाऊत्रे, सहकार्याध्यक्ष बंडू वाढई, गजानन वाढई, भवानी मांदाडे यांच्यासह मोठ्या संख्येने माळी समाज बांधव व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.