समाजाने एकत्र राहणे गरजेचे – रवि बेलूरकर

संताजी एक शाखीय तेली समाजाचे कौटुंबीक संमेलन पार

विवेक तोटेवार, वणी: संताजी एक शाखीय तेली समाजाचा कोजागिरी निमित्त कौटुंबीक स्नेहमिलन सोहळा पार पडला. रवि बेलुरकर यांच्या अध्यक्षतेखाली बाजोरिया लॉन वणी येथे हा सोहळा झाला. या कार्यक्रमात एकुण 145 कुटुंबातीस सुमारे 600 समाजबांधव उपस्थित होते. यावेळी कुटुंबाचा परीचय घेण्यात आला. महिला व लहाण मुलांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात आले. यात विविध बक्षीसं देखील देण्यात आली.

कार्यक्रमाला समाजातील ज्येष्ठ मान्यवर तानाजी पाऊनकर, बाबाराव खांदनकर, माजी नगरसेवक संतोष डंभारे, गाथा पिपराडे, सीमा डवरे इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणात रवि बेलूरकर म्हणाले की आज आपला समाज एकत्र करून हे पारिवारिक संमेलन आयोजित केले. समाज बांधवांना यापुढे ही कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र आणू. समाज बांधवांनी कायम एकत्र राहणे गरजेचे आहे. असे आवाहनही बेलूरकर यांनी यांनी यावेळी उपस्थितांना केले. 

कार्यक्रमात गाथा पिपराडे व सीमा डवरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र लिचोडे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मी पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार कैलास पिपराडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे संतोष डंभारे, विलास क्षिरसागर, विजय पिपराडे, गजानन पाटील, रविंद्र लिचोडे, पंढरीनाथ बोरपे, देवेंद्र गोबाडे, विशाल ठोंबरे, राजू पाटील, आशिष डंभारे, सचिन डवरे, अमन क्षिरसागर यांनी सहकार्य केले.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.