निकेश जिलठे, वणी: मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी केली, अखेरच्या दिवशी 17 उमेदवारांनी नामनिर्देश अर्ज दाखल केला. तर त्याआधी 3 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारांमध्ये भाजप, शिवसेना (उबाठा), मनसे व बसपा असे 4 उमेदवार मान्यताप्राप्त पक्षाचे आहेत. तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय), वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय गोंडवाना पार्टी, संभाजी ब्रिगेड अशा 4 नोंदणीकृत पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत. संजय खाडे यांनी काँग्रेस व अपक्ष असे दोन फॉर्म भरले आहे. मात्र त्यांना काँग्रेसतर्फे एबी फॉर्म मिळालेला नाही. एकूण 12 उमेदवारांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
संजीवरेड्डी बापूराव बोदकुरवार (भाजप), राजू मधुकरराव उंबरकर (मनसे), संजय निळकंठ देरकर (शिवसेना उबाठा), अरुणकुमार रामदास खैरे (बसपा) चार मान्यता प्राप्त पक्षाचे उमेदवार आहेत. तर अनिल घनश्याम हेपट (सीपीआय), राजेंद्र कवडुजी निमसटकर, प्रवीण रामाजी आत्राम (राष्ट्रीय गोंडवाना पार्टी), अजय पांडुरंग धोबे (संभाजी ब्रिगेड) या 4 नोंदणीकृत पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज भरले आहे. निखिल धर्मा ढुरके, यशवंत शिवराम बोंडे, देवाराव आत्माराम वाटगुरे, सुनील गणपतराव राउत, राहुल नारायण आत्राम, रत्नपाल बापूराव कनाके, केतन नत्थुजी पारखी, संतोष उद्धवराव भादीकर, आसिम हुसैन मंजूर हुसैन, हरिष दिगांबर पाते, नारायण शाहुजी गोडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
संजय खाडे यांचे दोन अर्ज
संजय खाडे यांनी एक काँग्रेसतर्फे तर एक अपक्ष अर्ज दाखल केला आहे. संजय खाडे यांना पक्षातर्फे एबी फॉर्म मिळालेला नाही. त्यामुळे त्यांची उमेदवारी छाननीच्या वेळी अपक्षच गृहित धरली जाणार आहे. यासह तिकीट नाकारल्याने किंवा युती आघाडीमुळे पक्षातर्फे उभे राहण्याची संधी न मिळाल्याने तीन ते चार कार्यकर्त्यांनी बंडखोरी करीत अर्ज दाखल केला आहे.
आज फॉर्मची छाननी, 4 नोव्हेंबर नंतर होणार चित्र स्पष्ट
सर्व उमेदवारांनी भरलेल्या फॉर्मची आज छाननी होणार आहे. छाननीत एबी फॉर्म न जोडलेले अर्ज यावर निर्णय घेतला जातो. एबी फॉर्म नसलेले अर्ज अपक्ष गृहित धरले जाते. तर फॉर्ममध्ये काही त्रुटी असेल तर असे फॉर्म रद्द केले जाते. त्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज परत घेता येणार आहे. शनिवारी व रविवारी सुटी असल्याने केवळ एकच दिवस उमेदवारी अर्ज परत घेण्यासाठी मिळणार आहे. अर्ज परत घेतल्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाते. त्यानंतरच निवडणुकीचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.
Comments are closed.