निवडणुकीची रणधुमाळी: ‘कामाचा माणूस’ राजू उंबरकर यांचा ग्रामीण भागात फोकस

तरुण, विद्यार्थी यांची फौज लागली कामाला, ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रचार

निकेश जिलठे, वणी: ‘कामाचा माणूस’ अशी टॅगलाईन घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरलेले राजू उंबरकर यांनी यावेळी ग्रामीण भागात आपल्या प्रचाराचा फोकस वळवला आहे. ग्रामीण भाग हा शेतकरी, शेतमजूर मतदारांचा म्हणून ओळखला जातो. सध्या शेतमालाला भाव नसल्याने हवालदिल झालेले शेतकरी व त्यांच्याकडे कामाला असणारा शेतमजूर हे त्यांचे टारगेट मतदार आहेत. या कामासाठी ग्रामीण भागातील तरुणांची फौज त्यांच्या मदतीला धावून आली आहे. ते उत्स्फूर्तपणे प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. वणी विधानसभा मतदारसंघातील तिन्ही तालुक्यातील ग्रामीण भाग ही फौज पिंजून काढीत आहे, अशी माहिती राजू उंबरकर यांनी ‘वणी बहुगुणी’ला दिली.

वणीत 2011 च्या नगरपालिका निवडणुकीत मनसे हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. सुरुवातीच्या काळात केवळ वणी शहरात फोकस करून त्यांनी नंतरच्या काळात ग्रामीण भागात आपला फोकस वळवला आहे. कधी सामाजिक कार्य, अडल्या नडल्यांना मदत, तर कधी लढाऊ बाण्यामुळे ग्रामीण भागात त्यांनी विविध आंदोलनं केलीत. त्यामुळे अल्पावधीतच वणीसह ग्रामीण भागातही त्यांची लोकप्रियता वाढली. त्याचाच परिणाम आता त्यांना निवडणुकीत दिसून राहिला आहे.

ग्रामीण भागासाठी तरुणाई धावली
कधीकाळी रोजगारासाठी उंबरकर यांच्याकडे गेलेले ग्रामीण भागातील तरुण, गावात बस सुरु करण्यासाठी गेलेले ग्रामीण भागाीतील विद्यार्थी, वैद्यकीय मदत केलेले ग्रामीण भागातील तरुण सध्या त्यांच्या प्रचारासाठी धावून आले आहेत. तरुणांच्या 11 फौज सध्या ग्रामीण भागात त्यांच्या प्रचाराला लागल्या आहेत. यातील काही वणी तालुका, काही मारेगाव तर काही झरी तालुक्यात कार्य करीत आहे. प्रचाराचा जोर वाढल्यावर या फौज आणखी वाढेल, असा विश्वास राजू उंबरकर यांनी ‘वणी बहुगुणी’जवळ व्यक्त केला.

ग्रामीण भागातील एक सभा

वणी शहरात विविध आंदोलनातून त्यांनी त्यांची एक लढाऊ नेता अशी सर्वसामान्यांमध्ये प्रतिमा तयार केली आहे. त्यामुळे वणीत त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. यात मोठ्या प्रमाणात तरुणांचा सहभाग आहे. मात्र गेल्या काही वर्षांतील सर्वसमावेशक कामांमुळे आता सर्व वयोगटात व ग्रामीण भागातही त्यांची प्रतिमा ‘कामाचा माणूस’ म्हणून झाली आहे. या ‘कामाच्या माणसाला’ मतदारांचा निवडणुकीत किती प्रतिसाद मिळणार, हे मतदानाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.

Comments are closed.