निकेश जिलठे, वणी: वणी विधानसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज घेण्याचा शेवटचा दिवस होता. आजच्या दिवशी चार उमेवारांनी अर्ज परत घेतला. सर्वांचे लक्ष लागलेले काँग्रेसचे संजय खाडे यांनी निवडणुकीच्या रिंगणात कायम राहण्याचा निर्णय घेतला. छाननीत 20 पैकी 4 उमेदवारांचा अर्ज बाद झाला होता. त्यामुळे 16 उमेदवार रिंगणात राहिले होते. तर आज दु. 3 वाजेपर्यंत 4 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. यात अजय पांडुरंग धोबे, आसिम हुसैन मंजूर हुसैन, यशवंत बोंडे या तीन अपक्षांचा तर राष्ट्रीय गोंडवाना पक्षाचे प्रवीण रामाजी आत्राम यांचा या उमेदवारांत समावेश आहे. दरम्यान संजय खाडे यांनी वसंत जिनिंगमध्ये 3.30 वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. यात ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
हे आहेत अंतिम उमेदवार
अरुणकुमार रामदास खैरे (बसपा), राजू मधुकरराव उंबरकर (मनसे), संजय निळकंठ देरकर (शिवसेना उबाठा), संजीवरेड्डी बापूराव बोदकुरवार (भाजप), अनिल घनश्याम हेपट (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया), राजेंद्र कवडुजी निमसटकर (वंचित बहुजन आघाडी), संजय रामचंद्र खाडे, केतन नत्थुजी पारखी, नारायण शाहु गोडे, हरिष दिगांबर पाते, निखिल धर्मा ढुरके, राहुल नारायण आत्राम असे 12 उमेदवार रिंगणात राहणार आहेत. तर आज यशवंत शिवराम बोंडे, अजय पांडुरंग धोबे, आसिम हुसैन मंजूर हुसैन व प्रवीण रामाजी आत्राम यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला. छाननीच्या दिवशी देवाराव आत्माराम वाटगुरे, सुनील गणपतराव राउत, रत्नपाल बापूराव कनाके, संतोष उद्धवराव भादीकर यांचे अर्ज बाद झाले होते. त्यामुळे रिंगणात 12 उमेदवार उरले होते.
निवडणूक झाली रंगतदार
संजय खाडे यांनी अर्ज भरल्यानंतर चार दिवसांत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. या काळात त्यांनी विविध पक्ष, सामाजिक संघटना, नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. तसेच इतर पक्षातील नाराज नेत्यांचीही त्यांनी भेट घेतली. या चर्चेनंतरच त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेताल. दरम्यान आज सकाळपासूनच ते अर्ज परत घेणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र दुपारी ते अर्ज परत घेणार नाही हे जवळपास निश्चित झाले. दु. 3 पर्यंत त्यांनी अर्ज परत न घेतल्याने ते निवडणूक लढण्यावर शिक्कामोर्तब झाले. महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी त्यांना समर्थन दिल्याचे बोलले जात आहे.
संजय खाडे यांच्या उमेदवारीमुळे आता वणी विधानसभेची निवडणूक चौरंगी होणार आहे. आ. संजीवरेडंडी बोदकुरवार, संजय देरकर, राजू उंबरकर व संजय खाडे यांच्यात मुख्य लढत होणार आहे. तर वंचितचे राजेंद्र निमसटकर, कम्युनिस्ट पक्षाचे अनिल हेपट व बसपाचे अरुणकुमार खैरे हे उमेदवार देखील शर्यतीत आहे.
अपक्षांना मिळाले बोधचिन्ह, कोणत्या उमेदवारांचे कोणते बोधचिन्ह?
Comments are closed.