खडकी ते अडेगाव मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे
रफीक कनोजे, झरी: तालूक्यातील खडकी ते अडेगाव हा मार्ग मागील १५ वर्षांपासून डबघाईस आला होता. अडेगाव ग्रामवासीं आणि मंगेश पाचभाई यांच्या पाठपुराव्याने व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रयत्नाने दि. ३० डिसेंबरला रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. या मार्गावरुन डोलोमाईट कंपन्याचे जड वाहतूकिचे ट्रक अवागमन करीत असतात. बांधकाम विभागाच्या मुक सहमत्तीमुळे ह्या मार्गाचे काम ईस्टिमेट प्रमाणे होत नसल्याने ह्या कामात गैरप्रकार होत असल्याचा आरोप अडेगाव ग्रामवासी करीत आहे. ह्याकडे आमदारांनी विशेष लक्ष द्यावे अशी ग्रामवासीयांची मागणी आहे.
अडेगाव हे गाव आमदारांनी निवडून आल्यानंतर दत्तक घेतले आहे. खडकी ते अडेगाव प्र. जि. मा. क्रमांक ७१ ह्या मार्गाचे ह्यापुर्वी भूमीपूजन ३१ आक्टोबर २०१५ मध्ये आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार ह्यानी केले होते. त्यावेळी दोन वर्षांत अडेगाव ते खडकी हा मुख्य रस्ता पूर्ण करु असा शब्द दिला होता. पण ह्या कामात कुठे मांजर आडवी आली हे तर कोनालाच माहीत नाही. त्यामूळे ह्या कामाची मुद्दत संपुन सुध्दा पूर्ण झाले नाही.
२०१९ मध्ये विधानसभा निवडणूक होत असल्यामुळे ह्या मार्गावरील काम करण्यास निधी प्राप्त झाला व हे काम मनोज उंबरकर ह्या ठेकेदाराला देण्यात आले. ३० डिसेंबरला ह्या मार्गाचे दुसर्यांदा आमदारांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. एका महिन्यापासून ह्या मार्गाचे काम सुरु आहे.
ह्या मार्गावरुन डोलोमाईट कंपन्याचे ३० ते ४० टनचे ट्रक अवागमन करीत असल्यामुळे ह्या मार्गाचे काम उत्कृष्ट दर्जाचे झाले पाहीजे अशी ग्रामवासियांचची मागणी आहे. ह्याकडे बांधकाम विभागाच्या अधिकार्यांचे दुर्लक्ष असल्यामुळे ह्या कामात गैरप्रकार होत आहे. अडेगाव ग्रामवासी केव्हाही आंदोलन करु शकतात. आमदारानी विशेष लक्ष द्यावे अशी ग्रामवासीयांची मागणी आहे.