रविवारी आ. बोदकुरवार यांचा ग्रामीण भागात डोअर टू डोअर प्रचार

नांदेपेरा येथे निघाली पदयात्रा, आज झरी तालुक्याचा दौरा

बहुगुणी डेस्क, वणी: आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा प्रचार सध्या जोमात सुरु आहे. पारंपरिक प्रचारासह हायटेक प्रचाराचा वापर त्यांच्या कडून केला जात आहे. रविवारी त्यांनी वणी तालुक्यातील वांजरी, मजरा, नांदेपेरा, भुरकी, वडगाव, झोला, कोना, सावर्ला, नायगाव, निळापूर, ब्राह्मणी, भालर, तरोडा, निवली इत्यादी गावात जाऊन प्रचार केला. यावेळी गावक-यांनी त्यांचे हार घालून स्वागत केले. तसेच या निवडणुकीत ते त्यांच्याच पाठिशी राहिल असा आशीर्वाद त्यांना दिला. आज आ. बोदकुरवार यांचा झरी तालुक्याचा दौरा आहे.

रविवारी आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा प्रचाराची सुरुवात वांजरी येथून झाली. त्यानंतर प्रचार ताफा मजरा येथे पोहोचला. मजरा येथील जगन्नाथ महाराज देवस्थानात भेट देऊन व तुकडोजी महाराज यांना वंदन करून त्यांनी मजरा गावाच्या प्रचाराला केली. त्यानंतर प्रचार ताफा नांदेपेरा येथे पोहेचला. येथे त्यांनी पदयात्रा काढली. त्याला मतदारांनी प्रतिसाद देत ते देखील पदयात्रेत सहभागी झालेत. यावेळी आ. बोदकुरवार यांनी विकासकामांचा दाखला देत काही अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहन मतदारांना केले.

डोअर टू डोअर प्रचारावर भर
आ. बोदकुरवार यांच्या एका दिशेने हायटेक प्रचार सुरु आहे. तर दुसरीकडे आमदार बोदकुरवार हे स्वत डोअर टू डोअर प्रचार करीत आहे. मारेगाव, झरी नंतर त्यांनी रविवार वणी तालुक्यात आपला डोअर टू डोअर प्रचार केला. तसेच इतर ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते, भाजप पदाधिकारी व महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते प्रचाराची धुरा सांभाळत आहे.

प्रचार ताफ्तात माजी जिल्हा परिषद सदस्य बंडू चांदेकर, ख. वि. अध्यक्ष अशोक सुर, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमुख विनोद मोहितकर, भाजपा तालुका सरचिटणीस मंजू डंबारे, दीपक मत्ते, सचिन खाडे, महेश देठे, पवन एकरे यांच्यासह भाजप व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज झरी तालुक्याचा प्रचार दौरा
आज सोमवारी दिनांक 11 नोव्हेंबर रोजी आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा झरी तालुक्याचा दौरा आहे. स. 7 वाजता गणेशपूर (खडकी) येथून प्रचाराला सुरुवात होणार आहे. त्यानंतर अडेगाव, खातेरा, येडशी, वेडथ, मुकुटबन, पिंपरड, बैलमपूर, राजूर, हिरापूर, मांगली, भेडाळा, येदलापूर, लिंगटी, धानोरा, रायपूर, दुर्भा, खरबडा, पाटण, दिग्रस, सुर्दापूर, कमळवेल्ली, सतपल्ली, उमरी, अहिरल्ली, दाभा, टाकळी असा प्रवास करीत वठोली येथे प्रचाराची सांगता होणार आहे. या दौ-या झरी तालुक्यातील भाजपचे, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार बोदकुरवार यांनी केले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.