प्रहार जनशक्तीचा राजू उंबरकर यांना जाहीर पाठिंबा
झरी तालुक्यात मिळाली राजू उंबरकर यांना बळकटी
बहुगुणी डेस्क, वणी: निवडणुकीचा प्रचारा आता रंगात आला आहे. रोज नवनवीन राजकीय घडामोडी होताना दिसत आहे. दरम्यान अशीच एक महत्त्वाची अपडेट मनसेबाबत आली आहे. तिस-या आघाडीचे बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पार्टीने मनसेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबतचे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे. वणी विभानसभेत प्रहारचा मोठा जनाधार आहे. विशेषत: ऍक्टिव्ह तरुणांची मोठी फौज प्रहारकडे आहे. त्यामुळे त्याचा मोठा फायदा राजू उंबरकर यांना होऊ शकतो.
वणी विधानसभा क्षेत्रात प्रहार किंवा तिस-या आघाडीच्या कोणत्याही घटक पक्षाचा अधिकृत उमेदवार नाही. त्यामुळे पक्षाचे झरी तालुकाध्यक्ष संतोष सिंगर यांनी आपल्या सर्व सहका-यासह मनसेला आपला पाठिंबा जाहीर केला. तसेच त्यांनी या निवडणुकीत प्रहारचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी राजू उंबरकर यांचा प्रचार करणार अशी ग्वाही दिली.
याबाबतचे पत्र त्यांनी वणीचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्याकडे सुपुर्द केला. प्रहारच्या पाठिंब्यामुळे झरी तालुक्यात राजू उंबरकर यांना चांगला फायदा होणार आहे. यावेळी प्रहारचे करण सोयाम, शंकर पडकार, महेंद्र गेडाम, गणेश कुडमेथे, सूरज जाधव, अरुण कोटनाके, प्रकाश धोंगडे, दिनेश काटकर, मनोज देवाळकर यांच्यासह प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राज ठाकरे यांच्या सभेनंतर मनसेच्या कार्यकर्त्यांचा जोश आणखी वाढला आहे. खेड्यापाड्यातील तरुणाई राजू उंबरकर यांचा प्रचारार्थ निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. वणी शहरात विविध आंदोलनातून त्यांनी त्यांची एक लढाऊ नेता अशी सर्वसामान्यांमध्ये प्रतिमा तयार केली आहे. त्यामुळे वणीत त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. यात मोठ्या प्रमाणात तरुणांचा सहभाग आहे. मात्र गेल्या काही वर्षांतील सर्वसमावेशक कामांमुळे आता सर्व वयोगटात व ग्रामीण भागातही त्यांची प्रतिमा ‘कामाचा माणूस’ म्हणून झाली आहे.
Comments are closed.