चंद्रपूर जिल्ह्यात जाणारी अवैध दारू पकडली
वणी/विवेक तोटेवार: वणी तालुक्यातील लालगुडा चौफुलीवर मंगळवारी दुपारी 12.30 वाजताच्या दरम्यान वणी पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यात जाणारी अवैध दारू पकडली. या प्रकरणी पोलिसांनी वणीतील बेलदारपुरा इथे राहणा-या एका इसमाला अटक केली आहे.
मंगळवारी पेट्रोलिंग करीत असत वणी पोलिसांना खबर मिळाली की, एक इसम इंडिका वाहनाने अवैधरित्या दारू चंद्रपूरला घेऊन जात आहे. मिळालेल्या माहितीवरून वणी पोलिसांनी सापळा रचून सिल्व्हर रंगाची इंडिकाला (एम एच 27 ए सि 9675) थांबवून झडती घेतली असता त्यामध्ये देशी दारूच्या 90 मीली क्षमतेच्या एकूण 1200 बाटल्या आढळून आल्या. ज्याची किंमत 36000 रुपये आहे. सोबतच दारू घेऊन जाण्याकरीता वापरण्यात आलेले वाहन ज्याची किंमत 1 लाख 25 हजार रुपये आहे. असा एकूण 1 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
याप्रकरणी चालक रामदास साधुजी निखाडे (36) वर्ष राहणार बेलदारपूरा वणी यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 65 (अ) नुसार (इ) गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकाचे सुदर्शन वनोळे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, नितीन सलाम, दीपक वंडर्सवर, अमित पोयाम यांनी केली.