यंदा रेकॉर्डब्रेक मतदान, वणी विधानसभा क्षेत्रा एकूण 2.15 लाख मतदान

पहिल्यांदाच मतदानाने गाठला 75 टक्के पेक्षा अधिकचा आकडा

निकेश जिलठे, वणी: गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी वणी विधानसभा क्षेत्रात सरासरी 73 टक्के मतदानाचा उच्चांग गाठला होता. मात्र यावेळी हि संख्या आणखी 2 ते 3 टक्क्यांनी वाढली आहे. ग्रामीण भागात दुपारी 3 पर्यंतच 70 टक्के मतदान झाले. तर शहरी भागात शेवटच्या एक तासात मतदानाने जोर परडला. यंदा बुथवर 74.87 टक्के मतदान झाले. तर पोस्टल आणि दिव्यांग मतदारांची संख्या एक ते सव्वा टक्का आहे. त्यामुळे ढोबळमानाने 76 टक्के मतदान वणी विधानसभा क्षेत्रात झाले. असे म्हणता येईल. हे वाढलेले मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार हे दोन दिवसात स्पष्ट होणार आहे.

शेवटच्या एक तासात पुन्हा पकडला जोर
वणी विधानसभा क्षेत्रात सुमारे 2.85 लाख मतदार आहेत. यापैकी सुमारे 2 लाख 13 हजार अधिक 2 हजार पोस्टल व दिव्यांग यांचे मतदान झाले. त्यामुळे यावेळी सुमारे 2.15 लाख मतदान झाले. स. 9 वाजता 9 टक्के, दु. 11 पर्यंत 25 टक्के, दु. 1 वाजता 40 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दुपारी 3 पर्यंत 57 टक्के मतदान झाले. मात्र दु. 3 ते 5 या कालावधीत मतदानाचा वेग मंदावला. या दोन तासात अवघे 7 टक्के मतदान झाले व मतदानाचा आकडा 64 (63.73) टक्क्यांवर पोहोचला. शेवटच्या एक तासात मतदानाने पुन्हा पिकअप पकडला व शेवटच्या एक तासात सुमारे 11 टक्के मतदान झाले.

उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क
आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी शाळा क्रमांक 7 मध्ये कुटुंबीयांसह मतदान केले. तर राजू उंबरकर यांनी शाळा क्रमांक 5 मध्ये पत्नी व मुलीसह मतदान केले. संजय देरकर यांनी सपत्नी मतदान केले. तर संजय खाडे यांनी पत्नीसह उकणी येथे मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्राच्या बाहेर सेल्फी पॉइंट होता. मतदानानंतर मतदार उत्साहात सेल्फी पॉइंटवर सेल्फी काढत होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शांततेत पार पडले मतदान
वणी विधानसभा क्षेत्रात एकूण 341 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. संपूर्ण मतदान शांततेत मतदान पार पडले. कुठेही ना अनुचित प्रकार समोर आला, ना कुठे ईव्हीएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. मतदान शांततेत पार पडावे यासाठी बाहेर राज्यातील पोलिसांचा ताफा आला होता.

Comments are closed.