तालुक्यात रेती तस्करीला ऊत, रात्रीस खेळ चाले….

रजा नगर जवळ रेतीची अवैधरित्या वाहतूक करणारा टिप्पल पकडला

बहुगुणी डेस्क, वणी: कळमना येथून रेतीचा अवैधरित्या उपसा करून रेती वाहतूक करणा-या टिप्परवर वणी पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी मारेगाव तालुक्यातील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी 22 लाखांचे टिप्पर व 5 हजारांची एक ब्रास रेती असा सुमारे 22 लाख 5 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेती तस्करीला ऊत आला आहे. मात्र त्यावर अद्यापही महसूल प्रशासन कठोर कारवाई करताना दिसत नाही. 

तक्रारीनुसार, मंगळवारी दिनांक 26 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास वणी पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान दीपक चौपाटी पासून वागदरा जाणा-या रोडवरील रजा नगर जवळ या पथकाला एक टिप्पर (MH34BG 4047) जाताना आढळले. या टिप्पर बाबत संशय आल्याने पोलिसांनी हे टिप्पर थांबवले. टिप्पर चालकाला ट्रॉलीत काय आहे अशी विचारणा केल्यावर त्याने त्यात रेती असल्याची माहिती दिली. पोलिसांनी रेती वाहतुकीचा परवाना (रॉयल्टी) बाबत विचारणा केली असता त्याच्याजवळ तो आढळून आला नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सदर टिप्परमध्ये सुमारे एक ब्रास रेती आढळून आली. रेती कुठून आणली अशी विचारणा केल्यावर चालकाने कळमना येथून सदर रेती आणल्याची माहिती दिली. रेतीची अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. टिप्पर मध्ये असलेला चालक लक्ष्मण संजय टेकाम (26) रा. नरसाळा ता. मारेगाव व क्लिनर शंकर मारोती टेकाम (20) रा. नरसाळा ता. मारेगाव यांच्याविरोधात बीएनएसच्या कमल 303(2), 3(5) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेती तस्करी
तालुक्यातील अहेरी बोरगाव, शिंदोला, बेलोरा परिसरातुन रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैधरित्या उपसा होतो व त्याची वाहतूक होते. यावर अध्ये मध्ये पोलीस प्रशासन कारवाई करते. मात्र महसूल प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. रेती तस्करीमुळे पर्यावरणाचे तर मोठे नुकसान होतच आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात प्रशासनाचेही आर्थिक नुकसान होत आहे. रेती तस्करीवर अंकुश बसावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहे.

(रेग्लुलर बातमी व अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून वणी बहुगुणीचा फेसबूक गृप जॉइन करा.. )

https://www.facebook.com/groups/241871233000964

Comments are closed.