संजय खाडे वेकोलि नागपूरच्या सुरक्षा समिती (TSC) सदस्यपदी

कर्मचारी व वेकोलि भागातील समस्या सोडवण्याचे खाडे यांचे वचन

बहुगुणी डेस्क, वणी: संजय खाडे यांची वे.को.लि नागपूरच्या सुरक्षा समिती सदस्यपदी (टी.एस.सी मेंबर) नियुक्ती करण्यात आली. यानिमित्त वणीतील एएसएल लॉन येथे कोयला क्षेत्रीय सभा (वणी क्षेत्र) अंतर्गत प्रवेश कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला हिंद मजदूर सभा H.M.S. युनियन व वणी क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी संजय खाडे यांनी वे.को.लि कर्मचारी व वेकोलि भागातील अधिकाधिक समस्या सोडवण्याचे वचन दिले. संजय खाडे हे आपल्या नियुक्तीचे श्रेय एच.एम.एस. संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवकुमार यादव यांना देतात.

कार्यक्रमाला एचएमएस संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व कोयला श्रमिक सभेचे अध्यक्ष शिवकुमार यादव, शरद धांडे, महामंत्री व संचालन समिती सदस्य वेकोलि, दीपक जयस्वाल कोषाध्यक्ष व अध्यक्ष वेकोलि वणी क्षेत्र, विकास सोनटक्के महामंत्री, वणी क्षेत्र यांची प्रमुख उपस्थिती होती. यादव यांच्या हस्ते खाडे यांना नियुक्त पत्र प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी कामगारांचे हक्क, कामगार कल्याण व संघटनेच्या मजबुतीवर चर्चा केली. मोठ्या पदामुळे आता जबाबदारी वाढली आहे. वेकोलिच्या सर्व स्तरातील कर्मचा-यांच्या समस्या सोडवण्यासाठी व वेकोलि भागातील समस्या सोडवण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करणार, असे वचन संजय खाडे यांनी दिले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वेकोलि खाण क्षेत्रातील कामगार उपस्थित होते. वेकोलिच्या सुरक्षा समितीचे सदस्य हे एक मोठे व जबाबदारीचे पद आहे. संजय खाडे यांच्या नियुक्तीमुळे वेकोलि कर्मचारीवर्गात समाधान व्यक्त होत आहे. खाडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Comments are closed.