वणी विधानसभेतील मनसेची सर्व कार्यकारिणी बरखास्त

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा निर्णय

बहुगुणी डेस्क, वणी: वणी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अपयश आले. नंतर संघटनात्मक बांधणीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. वणी विधानसभा मतदारसंघातील वणी मारेगाव व झरी या तिन्ही तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना व अंगीकृत संघटनाचे सर्व पदे बरखास्त करण्यात आले आहे. या पदावर लवकरच नवीन पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात येईल. हा एक पक्ष संघटन मजबूत करण्यासाठीचा निर्णय आहे. राज ठाकरे हे लवकरच नवीन पदाधिका-यांची नियुक्ती करणार आहेत. नियुक्ती होत पर्यंत कोणत्याही पदाधिकारी यांच्याकडे कोणतेही अधिकार राहणार ना, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकातून राजू उंबरकर यांनी दिली.

Comments are closed.